(फोटो सौजन्य: Instagram)
आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) आजकाल आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. आपल्या प्रत्येक कामात आपण एआयची मदत घेऊ शकतो. रोजच्या जीवनातील अनेक कामे सुखकर करण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अशातच एआय संबंधित एक मजेदार आणि हास्यास्पद व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. यात एक आज्जी चक्क एआयसोबत भिडताना दिसून आल्या. आज्जीच्या प्रश्नांना एआयने जे उत्तर दिलं ते ऐकून आता सर्वांनाच हसू अनावर झालं आहे. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
एआयचा वाढणारा प्रभाव आपल्यासाठी फायदेकारक असला तरी तो वडिलधाऱ्यांसाठी मात्र एक कोड बनून राहिला आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक आज्जी एआयसोबत संवाद साधताना दिसून आली. व्हिडिओमध्ये ती विचारते की, “तू नक्की राहतोस कुठे” यावर एआय तिला “मी फक्त ऑनलाइन उपलब्ध असतो, तुम्हाला काय मदत हवी आहे?” असे उत्तर देतो. पण आज्जीना काय हे उत्तर आवडत नाही ज्यानंतर ती पुन्हा एआयला तोच प्रश्न विचारते ज्यावर एआय तिला म्हणतो, ” मी एकाच ठिकाणी राहत नाही, पण मी कायम तुमच्या मदतीसाठी हजर राहीन”. एआयचे हे उत्तर ऐकून आज्जीला राग अनावर होतो आणि रागातच ती म्हणते की तुझ्या मदतीची ऐसीची तैसी. आज्जींचे हे उत्तर ऐकून सर्वांनाच हसू अनावर होते आणि इंटरनेटवर हास्याचा पूर येतो आणि लोक हा व्हिडिओ वेगाने शेअर करू लागतात.
हा व्हायरल व्हिडिओ @rockstardadi_ji नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे चॅटजीपीटी नाही आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आज्जींचा स्वतःचा स्वॅग आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “आजीची निरागसता किती गोड आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.