वर्षभराने केअरटेकरला पाहताच हत्तीच्या कळपाने केअरटेकरचे केले जंगी स्वागत
आपल्या विशाल शरीरासाठी आणि शांत मस्तीखोर स्वभावासाठी ओळखला जाणारा जंगलाचा प्राणी म्हणजे हत्ती! हा प्राणी मानवांच्या जणू मित्रच आहे, अनेक ठिकाणी हत्तीला पाळले जाते आणि यात लोकांना कोणताही त्रास होत नाही कारण त्याचा मुळात स्वभावचं इतका शांत आणि मनमौजी आहे की मानवाला याच्यामुळे कोणताही धोका जाणवत नाही. आपले भलेमोठे शरीर असूनही हा प्राणी कधीही आपल्या ताकदीचा बडेजाव करत नाही आणि हीच गोष्ट त्याला आणखीन खास बनवते. एकवेळ माणसं विश्वासघात करतील पण प्राणी करणार नाहीत ही म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल याचेच एक सुंदर उदाहरण सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे ज्यातील दृश्यांनी सर्वांनाच मोहित करून सोडलं आहे. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
या व्हायरल व्हिडिओमध्ये हत्तीचा एक भलामोठा कळप आणि त्यांच्या केअरटेकरचे हृदयस्पर्शी पुनर्मिलन दाखवले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे म्हटले आहे की, एका वर्षाच्या दीर्घ कालावधीनंतर, जेव्हा केअरटेकर त्याच्या हत्ती कुटुंबात भेटण्यासाठी परतला तेव्हा, सर्व हत्ती त्याला पाहून इतके आनंदी झाले की त्याला पाहताच ते त्याला भेटायला धावले आणि सर्वांनी त्याला मिठी मारून त्याचे स्वागत केले. व्हिडिओमध्ये असे दिसून येते की केअरटेकर जवळ येताच हत्तींचा कळप दुरूनच आनंदी होत केअरटेकरच्या दिशेने धाव घेतात आणि धावत त्याच्या जवळ जाऊन त्याला आपल्यासोबत घेऊन जातात. हे सर्वच पाहायला फार मनोरंजक आणि सुंदर वाटू लागते. हत्तींचा निरागसपणा आणि त्यांच्या केअरटेकरचे त्यांच्यावर असेलेले प्रेम व्हिडिओत स्पष्ट दिसून येते जे या व्हिडिओला आणखीन खास बनवते.
Elephants react to seeing beloved caretaker for first time in over a year (warning: loud!) pic.twitter.com/jK40R0cQLC
— Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) July 21, 2025
दरम्यान हे सुंदर दृश्य @AMAZlNGNATURE नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हत्ती किती वेळ एखाद्याला लक्षात ठेवू शकतात?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हत्तींच्या त्यांच्या प्रिय काळजीवाहकासोबतच्या पुनर्मिलनाचा एक उत्तम हृदयस्पर्शी व्हिडिओ” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “आशियाई हत्तीपेक्षा मोठा पाळीव प्राणी असू शकत नाही”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.