A lion cub got caught in the clutches of aligator video goes viral
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये जंगली प्राण्यांचे तर अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर तुम्ही पाहिले असतील. यामध्ये प्राण्यांचे रोजच्या जीवनातील दृश्यांचे आपल्याला दर्शन घडते. काही व्हिडिओ अतिशय गोड असतात, तर काही भयावह व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये जंगलातील वाघ, सिंह, लांडगा यांसारख्या हिंसक प्राण्यांचे शिकारीचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुम्ही पाहिले असतील. सहसा जंगली प्राण्यांचे जीवन भक्ष्यावरच अवलंबून असते. येथे प्राणी प्राण्यांना मारतात, यामध्ये हिंसक प्राण्यांचे जीवन तर दुसऱ्या प्राण्याच्या मृत्यूवरच अवलंबून असते.
सध्या असाच एक भयावह व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. धक्कादायक म्हणजे, यामध्ये एक शिकारी म्हणजेच सिंह शिकार झाला आहे. हा थरकार उडणारा व्हिडिओ सध्या प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक सिंहाचा कळप नदीकाठी पाणी पिण्यासाठी आलेला आहे. काही वेळानंतर कळप तिथून निघून जातो. परंतु सिंहाचे एक पिल्लू तिथेच राहते. सिंहाचे पिल्लू शांतपणे पाणी पित असते. याच वेळी मगरींचा अचानक हल्ला होता. तुम्ही व्हिडिओ पाहू शकता की, एकामागून एक मगरींचा हल्ला सिंहाच्या पिल्लावर होत आहे. पाण्यामध्ये अनेक मगरी आहेत. पिल्लू आपला जीव वाचवण्यासाठी पळू लागते. उंच मातीच्या भितींवर तो धावत असते. जीव वाचवण्यासाठी पिल्लू सर्वोतपरी प्रयत्न करते. परंतु एक महाकाय मगर त्याला शक्तीशाली जबड्यात पडकते आणि पाण्यात ओढते. सध्या या थरकाप उडवणाऱ्या दृश्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @wildlife_bigcats या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतपार्यंत हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडिओ पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे. यावर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहे. एका युजरने म्हटले आहे की, यात वाईट वाटण्यासारखे काही नाही, जंगली प्राण्यांचे-पक्षांचे जीवन असेच असते, तर दुसऱ्या एकाने शिकारीच्या शिकारी शिकाऱ्याने केली असे म्हटले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.