क्या चोर बनेगा रे तू! जिममध्ये हात साफ कारायला गेला पण अशी शिक्षा मिळाली की फुटला घाम; VIDEO पाहून हसू आवरणार नाही (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. भांडण, स्टंट, जुगाड, यांसारखे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. तसेच चोरीच्या घटनांचे देखील अनेक व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. कधी चैन चोरी करताना, तर कधी बॅंक रॉबरीचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. अनेकादा याचे काही मजेशीर व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळतात.
अनेकदा चोरट्यांची रंगेहाथ पकडले गेल्याने जी अवस्था होते की पुन्हा कधी आयुष्यात चोरी करण्याचा विचारही चोरटे करणार नाहीत. सध्या असाच काहीसा प्रकार या चोरासोबत घडला आहे. हा चोर एका जिममध्ये चोरी करण्यासाठी गेला होता, परंतु जिमच्या मालकाने त्याला रंगेहाथ पकडले अन् त्यानंतर जे घडले की चोरालाचा घाम फुटला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक तरुण जिम करताना दिसत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण जिममध्ये चोरी करण्यासाठी आला होता. परंतु जिमच्या मालकाने त्याला रंगेहाथ पकडले. नंतर मालकाने त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्याऐवजी त्याला जिममध्ये वर्कआऊट करायाला लावले. तरुणाला पुश-अप्स करायाला लावले, जड वजन उचलायला लावले, तसेच स्कॅ्वट्स आणि पॅंक्लस मारयाला लावले. तुम्ही चोर तरुणाकडे पाहिले तर लक्षात येईल तो अगदी बारीक आहे. त्याला या सगळ्या गोष्टी करण्यात अगदी अवघड जात आहे. चोरटा खूप थकला आहे. परंतु जिम मालक त्याला अजिबात सोडत नाही. तुम्ही पाहू शकता की चोरट्याला चांगलाच घाम फुटला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
Thief Forced to Exercise After Being Caught in Cox’s Bazar Gym
pic.twitter.com/iaPhNJmRcC — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) July 12, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडिवर चर्चेचा विषय बनला आहे. अनेकांवी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत, एका युजरने भाई जिममध्ये काय चोरी करायला गेला होतास? असा प्रश्न केला आहे. तर दुसऱ्या एका युजरने मला बिचाऱ्याची दया येतेय असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना त्याची दया आली आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.