Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Pawar Plane crash New Video: अजित पवारांचा अपघात की घातपात? दुर्घटनेचा नवा ‘स्फोटक’ व्हिडिओ समोर

तोपर्यंत पोलिस प्रशासन आणि अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिसर सील केला. आग आटोक्यात आणली गेली. पण या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह आणि पाच जणांचा मृत्यू झाला.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 15, 2026 | 03:58 PM
Ajit pawar Plane crash News Update, Ajit Pawar death News,

Ajit pawar Plane crash News Update, Ajit Pawar death News,

Follow Us
Follow Us:
  • २८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघाताचा एक नवीन व्हिडिओ समोर
  • हा अपघात केवळ तांत्रिक बिघाडामुळे झाला की तो जाणीवपूर्वक घडवून आणलेला घातपात होता, यादृष्टीने तपास सुरू
  • प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, विमान कोसळल्यानंतर ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले तेव्हा आगीच्या ज्वाळा उसळत होत्या आणि त्याच दरम्यान विमानात पुन्हा एक मोठा स्फोट झाला.
Ajit Pawar Plane crash New Video: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. गेल्या महिन्यात २८ जानेवारी रोजी बारामती विमानतळाजवळ अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या अपघाताला आज १९ दिवस झाले असून त्यासंदर्भात घातपाताचा संशयही व्यक्त केला जात आहे. अशातच आज पुन्हा एकदा अजित पवार (Ajit Pawar Plane Crash)  यांच्या विमान अपघाताचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे.

दुर्घटनेच्या वेळी नेमके काय घडले, याचे चित्रण असलेला एक व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओमुळे पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. “हा केवळ तांत्रिक बिघाडामुळे झालेला अपघात आहे की जाणीवपूर्वक घडवून आणलेला प्रकार, हे या व्हिडिओच्या फॉरेन्सिक तपासणीनंतर स्पष्ट होईल,” असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Karjat News : रस्त्याचं निकृष्ट बांधकाम, अवघ्या सहा महिन्यात खड्डे; संतप्त गावकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

बारामती तालुक्यातील गोजुबाई येथे २८ जानेवारी रोजी सकाळी ८.४५ वाजण्याच्या सुमारास अजित पवार यांचे विमान कोसळल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. विमान कोसळल्याने काही क्षणातच विमानाला भीषण आग लागली होती. ज्वाळा उसळत होत्या. गावकरी तिथे पोहल्यानंतरही विमानातून मोठमोठ्या ज्वाला उसळत होत्या. त्यावेळी विमानातून पुन्हा एक जोरदार स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. (NCP)

घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी तिथे व्हिडीओदेखील काढले. यात एका तरुणाने काढलेल्या व्हिडीओमध्ये विमानाला आग आगल्यानंतर मोठा स्फोट झाल्याचे दिसत आहे. हा स्फोट इतका भयानक होता की आधीच जळत असलेल्या विमानातून पुन्हा मोठ्या आवाजात स्फोट होताना स्पष्ट दिसत आहे. या स्फोटानंतर आगीचे लोट दुरवर पसरले होते. काही काळ भीतीचे वातावरणही निर्माण झाले होते.

दरम्यान, तोपर्यंत पोलिस प्रशासन आणि अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिसर सील केला. आग आटोक्यात आणली गेली. पण या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह आणि पाच जणांचा मृत्यू झाला. प्रशासन, पोलिस आणि अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसर सील करत आग आटोक्यात आणली. या दुर्घटनेचा पुढील तपास तपास यंत्रणांकडून सुरू आहे. या नवीन व्हिडिओ मुळे तपासाची चक्रे वेगाने फिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या नव्या पुराव्यामुळे ही घटना केवळ एक अपघात होती की त्यामागे कोणताही घातपात होता, या दृष्टीने आता पोलीस तपास करत आहेत.

Sambhajinagar 250 coror scam: क्यूआर कोड एकाचा, वर्क ऑर्डर दुसऱ्याची; संभाजीनगर PWD विभागात

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली आहे. हा स्फोट विमानातील इंधनामुळे झाला की त्यात काही स्फोटके होती, याचा तपास करण्यासाठी हा व्हिडिओ फॉरेन्सिक लॅब (Forensic Science Laboratory) कडे पाठवण्यात आला आहे. आमदार अमोल मिटकरी, रोहित पवार आणि संजय राऊत यांनी यापूर्वीच घातपाताचा संशय व्यक्त केला होता. रोहित पवार यांनी तर दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन अनेक तांत्रिक प्रश्न उपस्थित केले आहेत. विमानाचे आदल्या रात्री झालेले बुकिंग आणि विमानातून झालेला स्फोट हे सर्व संशयास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सध्या या प्रकरणाचा तपास सीआयडी (CID) आणि डीजीसीए (DGCA) करत आहेत. विमानाचा ‘ब्लॅक बॉक्स’ सापडला असून, त्यातील माहितीचे विश्लेषण सुरू आहे. हा नवीन व्हिडिओ आता पुराव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

 

Web Title: Ajit pawar plane crash new video was ajit pawars accident or a suicide new explosive video of the accident surfaced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 03:48 PM

Topics:  

  • ajit pawar plane crash
  • Baramati Politics
  • viral video

संबंधित बातम्या

IND Vs WI: भारत-वेस्ट इंडिज सामन्याआधी तिकीटांचा काळाबाजार? रांचीतील ‘त्या’ VIDEO ने खळबळ
1

IND Vs WI: भारत-वेस्ट इंडिज सामन्याआधी तिकीटांचा काळाबाजार? रांचीतील ‘त्या’ VIDEO ने खळबळ

Viral Video: मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट! VIDEO समोर येताच पश्चिम रेल्वेची कारवाई
2

Viral Video: मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट! VIDEO समोर येताच पश्चिम रेल्वेची कारवाई

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral
3

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral

Baramati Politics: दादा नसताना अशी सभा घ्यावी लागेल, असे कधीच वाटले नव्हते; जय पवार भावूक
4

Baramati Politics: दादा नसताना अशी सभा घ्यावी लागेल, असे कधीच वाटले नव्हते; जय पवार भावूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.