कुटुंबासमोरच पाणघोड्याला खाऊ पाहत होता सिंह तितक्यातच वडिलांना असा प्रहार केला की जंगलाचा राजा पळतच सुटला; Video Viral
जंगलात प्राण्यांमध्ये नेहमीच संघर्ष सुरु असतो. काहीजण आपली भूक भागवण्यासाठी इतर प्राण्यांची शिकार करतात तर काही या शिकारीला बळी पडतात. सिंहाला जंगलाचा राजा मानलं जातं. आपल्या ताकदीने तो भल्याभल्यांची हवा टाइट करतो पण जेव्हा गोष्ट कुटुंबाची येते तेव्हा राजालाही यापुढे झुकावंच लागत. जंगलातील अनोख्या शिकारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात एक सिंह एका पाणघोड्याची त्याच्या कुटुंबासमोर शिकार करताना दिसून आला. सिंहाने त्याला खायला सुरुवात केलीच होती पण तितक्यात कुटुंबातील एका सदस्याने असा आवाज उठवला की सिंहही घाबरून गेला. व्हिडिओतील हे दृश्य आता सोशल मीडियावर चांगलेच धुमाकूळ माजवत असून लोक सिंहाला असे घाबरताना पाहून अचंबित झाले आहेत.
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता, यात नदीकिनारी सिंहांचा एक गट एका पाणघोड्यावर हल्ला करताना दिसतो. सिंह त्याला फाडून टाकत असताना पाणघोडा ओरडत आहे. पण सिंहाची टोळी मात्र निर्दयपणे त्याची शिकार करण्याच्या उद्देशात असतात. यावेळी पाणघोड्याच कुटुंबही तिथे उपस्थित असत जे हे सर्व आपल्या डोळ्यांनी घडताना पाहत असतात. सुरुवातीला ते काहीच बोलत नाही पण जसा पाणघोडा दुःखाने ओरडू लागतो तेव्हा कुटुंबातील एकाला ते पाहवत नाही आणि तो थेट सिंहावर प्रतिहल्ला करत त्याच्या अंगावर धावून येतो. त्याचा हा जोश आणि डोळ्यातील भयानक राग इतका धोकादायक असतो की ते पाहून सिंह लगेच घाबरतो आणि दुसऱ्या क्षणालाच तिकडून पळत सुटतो. अशाप्रकारे आपल्या कुटुंबाची साथ पाणघोड्याचा जीव वाचवते आणि सिंहाला पळवून लावण्यास मदत करते.
pic.twitter.com/0Fs9UByQsR — Wildlife Uncensored (@TheeDarkCircle) September 23, 2025
25 लाख दगड फोडून कसं उभारलं कैलास मंदिर? 1200 वर्षांपूर्वी नक्की काय घडलं? अद्भुत AI Video Viral
जंगलाचा हा व्हिडिओ @TheeDarkCircle नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “निसर्ग क्षमाशील नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तो हिप्पो हाडकुळा आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “पण जंगलात नक्की व्हिडिओ कोण बनवत आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.