(फोटो सौजन्य: Instagram)
औरंगाबादमधील (आता छत्रपती संभाजीनगर) वेरूळ लेण्यांमध्ये कैलास मंदिर आहे. हे राष्ट्रकूट वंशातील राजा कृष्ण पहिला याने आठव्या शतकात बांधले असून, हे एक जागतिक वारसा स्थळ आहे. हे द्रविड शैलीतील मंदिर असून, ते डोंगरातून वरपासून खालपर्यंत कोरुन बननले गेले आहे. हे मंदिर दिसायले फार सुंदर आहे आणि आयुष्यात एकदा तरी प्रत्येकाने या मंदिराला भेट द्यायले हवी. मंदिराची भव्यता आणि कोरीव काम इतके सुबक आणि आकर्षित आहे की जो इथे जातो तो या ठिकाणाच्या प्रेमात पडतो. हे मंदिर जवळपास १२०० वर्षे जुनं आहे. अद्ययावत तंत्रज्ञान नसतानाही मंदिर इतक्या भव्यतेने कसे बांधण्यात आले याचे गूढ आता AI च्या मदतीने आपल्या समोर आले आहे. मंदिराची उभारणी त्यावेळी नक्की कशी केली असेल याचा एक AI व्हिडिओ आता सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे. चला यात नक्की काय दिसलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय दिसलं व्हिडिओत?
सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये शेकडो कारागिर दगड फोडून मंदिराची उभारणी करताना दिसून येत आहेत. फार शिताफीने ते दगडावर कोरीव काम करुन याला एक अद्भूत रुप मिळवून देतात. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये मंदराची माहिती देण्यात आली आहे. यात लिहिले आहे की, ‘वेरूळमधील कैलास मंदिर दगडांनी बांधलेले नाही, तर एकाच डोंगरातून कोरलेले आहे. मंदिर कोरण्यासाठी २५,००० टन दगड काढून टाकण्यात आले – सर्व आधुनिक यंत्रांशिवाय, ही जगातील सर्वात मोठी अखंड दगडी बांधकाम आहे. हे मंदिर अथेन्समधील पार्थेनॉनच्या क्षेत्रफळाच्या दुप्पट आहे, तरीही एकाच कड्यावरून वरपासून खालपर्यंत कोरलेले आहे.
पुढे यात लिहिले आहे की, ‘भगवान शिव यांना समर्पित, या मंदिराचे नाव कैलास पर्वतावरून ठेवण्यात आले आहे, जो त्यांचे पौराणिक निवासस्थान आहे. मध्यवर्ती मंदिराच्या बाजूला भव्य दगडी हत्ती आणि नंदी मंडप आहेत, जे सर्व एकाच दगडाच्या ढिगाऱ्यातून कोरलेले आहेत. याचे संरेखन आणि सममितीची अचूकता इतकी प्रगत आहे की आजही अभियंते आश्चर्यचकित होतात की ते कसे साध्य झाले.हे केवळ एक मंदिर नाही. हे ८ व्या शतकातील राष्ट्रकुटांच्या भक्ती, दूरदृष्टी आणि अभियांत्रिकी प्रतिभेचे विधान आहे’.
हुंड्याच्या बेडसह बॉयफ्रेंड पण फ्री! बेडखाली लपून बसला होता, उघडताच जे घडलं… मजेदार Video Viral
AI द्वारे तयार केलेल्या या मंदिराच्या मदतीने आपल्याला कैलास मंदिराच्या बांधकामाचा इतिहास आणखीन जवळून पाहता येतो. याचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर @kaalchakrabharat.ai नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “खूप छान एआय” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कैलास मंदिर आणि पुरातत्वीय पुरावे हे सर्व बुद्ध विहारमध्ये आढळतात” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “त्यांना कसे कळले की ते सर्व एकाच दगडात मिसळले आहे….जबरदस्त”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.