अबब! अजगरासोबत अंघोळ; व्हिडीओ व्हायरल, नजारा पाहून लोकांचा थरकाप उडाला
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. लोक इतके विचित्र स्टंट करतात ज्यामुळे जीव धोक्यात येऊ शकतो. सध्या असाच एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे. या जगात विविध प्रकारचे लोक राहतात. तुम्ही तुमचे डोके धरून विचार कराल की लोकांना असे छंद कसे असू शकतात.
या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत तुम्हाला दिसेल की एक व्यक्ती धोकादायक अजगरासोबत अंघोळ करत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे अजगरही प्रियकरांप्रमाणे माणसाच्या अंगाला चिकटून बसून थंड पाण्याचा आनंद घेत आहे. असे अजगरासोबत आंघोळ करणे कोणत्याही व्यक्तीसाठी जीवघेणे ठरू शकते. पण या व्यक्तीच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती दिसत नाही. तो स्वत: त्या अजगराला अंघोळ घालत आनंद घेत आहे.
तज्ज्ञांचे म्हणण्यानुसार, अजगर आणि साप कधीही पाळीव प्राणी नसतात. ते थोडे दिवस शांत राहतात. जोपर्यंत त्यांना धोका वाटत नाही तोपर्यंत हल्ला करत नाहीत. माणसाची कोणतीही चूक नसाताना देखील ते जीव घेऊ शकतात. अजगर खूप आक्रमक असतात आणि ते कधीही कोणावरही हल्ला करतात. अजगरात विष नसले तरी तो एका झटक्यात अर्धा किलो माणसाचे मांस खातो. तुम्ही पाळलेल्या अजगराने मालकालाच खाल्ल्याच्या घटना देखील ऐकल्या असतील. पण या माणसाला अजगरासोबत पाहून त्याला मृत्यूची भीतीच उरली नाही असे वाटत आहे.
‘तू वेडा झाला आहेस’
world_of_snakes_ नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत दीड लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर अनेकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. सोशल मीडियावर युजर्स व्हिडिओबाबत त्या व्यक्तीला आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. बऱ्याच लोकांनी या व्यक्तीचा व्हिडिओ पाहिल्यावर या व्यक्तीला वेडा म्हणू लागले आहेत.