A woman's slipped while getting off a moving train see what happens video viral
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हि़डिओ व्हायरल होत असतात. डान्स, स्टंट, जुगाड यांसारखे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. तसेच अनेक अपघातांचेही भयावह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात लोकांच्या चुकीमुळे, वाहतूकीचे पालन न केल्यामुळे होतात. शिवाय गाडी चालवणाऱ्याने नव्हे, तर त्याचा वापर करणाऱ्या प्रत्येकासाठी वाहतुकीचे नियम महत्वाचे असतात. तुम्ही बसमधून, ट्रेनमधून, कॅब यांसरख्या वाहनाने प्रवास करत असाल तर तुमचीही वाहतूकीचे नियम पाळण्याची तितकीच जबाबदारी. वाहनांमधून उतरताना आजू-बाजूला पाहणे, वाहन पूर्णपणे थांबल्यावर उतरणे अत्यंत महत्वाचे असते. नाहीतर तुमची एक चूक तुम्हाला जास्त महागात पडू शकते.
सध्या केरळामधील असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक मुलगी आणि एक महिला ट्रेन थांबायच्या आधीच उतरायचा प्रयत्न करतात. दोघीही गप्पा मारत असतात. यावेळी मुलगी पटकन खाली उतरते. पण महिला उतरायला गेल्यावर ती खांबाचा हात सोडत नाही. यामुळे ती तिचा पाय घसरतो आणि ट्रेन पुढे जात असताना त्याखाली जाणारच असते. व्हिडिओ पाहताना क्षणभरासाठी तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल. पण तिथून प्लॅटफॉर्मवरुन जाणाऱ्या व्यक्तीमुळे महिलेचा जीव वाचतो. महिला पडत असल्याचे दिसतात ती व्यक्ती महिलेला पकडते आणि तिला वर ओढते. यामुळे महिलेचा जीव वाचतो. पण महिलेची गाडी थांबण्यापूर्वी उतरण्याची चूक तिला चांगलीच महागात पडली असते. सुदैवाने तिला कोणतीही गंभीर दु:खापत होत नाही.
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @ghantaa या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी प्लॅटफॉर्मवरील प्रवाशाच्या सतर्कतेचे कौतुक केले आहे. तर महिलेवर आणि मुलीवर टीका केली आहे. एका युजरने महिलेच्या हातात मॅग्नेट होते का असे विचारले आहे, तर दुसऱ्या एकाने माणसाला अवॉर्ड दिला पाहिजे, त्याने सतर्कता दाखवत महिलेचा जीव वाचवला असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पण यातून लक्षात घेणे महत्वाचे आहे की, केवळ गाडी चालवणाऱ्याने नव्हे, तर त्यातून प्रवास करणाऱ्यानेही वाहतूकीचे नियम पाळले पाहिजेत.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.