एक ब्रेकअप अन् जीवाला मुकली महिला! हजारो फूट उंचीवर उडणाऱ्या विमानातून मारली उडी; चित्तथरारक Video Viral
कोणतेही नातं फक्त सुरु करणं महत्त्वाचं नसत तर ते टिकवूनही ठेवता आलं पाहिजे. आजकाल प्रेमाच्या व्याख्या फार बदलल्या आहेत. लोक फार पटकन एखाद्याच्या प्रेमात पडतात आणि तितक्याच लवकर वेगळे देखील होतात. ब्रेकअप जरी काही मिनिटांत केलं असलं तरी त्याच दुःख आपल्याला आतपर्यंत जाणवत असत. बरेच लोक यातून बाहेर येतात तर काही यातच अडकून राहतात. ब्रेकअपच्या दुःखातून बाहेर पाडण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात तर काही टोकाचा निर्णय घेतात. अशीच एक घटना ब्रिटनमध्ये घडून आली आहे ज्याने सर्वच हादरून गेले. महिलेने ब्रेकअपनंतर असे काही केले की ज्याची कुणी स्वप्नातही कल्पना केली नसावी.
काय आहे प्रकरण?
ब्रिटनमधील साउथ वेल्समधून एक धक्कादायक प्रकार समोर आला. इथे एका ३२ वर्षीय महिलेला तिच्या बॉयफ्रेंडसोबतच्या ब्रेकअपचे दुःख सहन झाले नाही आणि तिने आपले जीवन संपवले. ब्रेकअपनंतर मुलीने असे भयानक पाऊल उचलले ज्याची कल्पना क्वचितच कोणी केली असेल. ही घटना २७ मे २०२५ रोजी घडली. जिथे ३२ वर्षीय जेड डॅमरेल तिच्या बॉयफ्रेंडशी ब्रेकअप झाल्यानंतर इतकी अस्वस्थ झाली होती की तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. जेड एक अनुभवी स्कायडायव्हर होती, तिने १०,००० फूट उंचीवरून विमानातून उडी मारली आणि उडी मारल्यानंतर मुद्दाम तिचे पॅराशूट उघडले नाही. त्यामुळे ती जमिनीवर पडली आणि तिचा मृत्यू झाला.
डेली मेलच्या वृत्तानुसार, साउथ वेल्समधील रहिवासी डॅमरेल गेल्या सहा महिन्यांपासून बेन गुडफेलो या २६ वर्षीय मुलासोबत रिलेशनशिपमध्ये होती, मुलगा तिच्यापेक्षा ६ वर्षांनी लहान आहे आणि तो स्कायडायव्हर देखील आहे. ख्रिसमसपासून एकत्र स्कायडायव्हिंग आणि एअरफील्डजवळ भाड्याच्या जागेत एकत्र राहणे आणि मग अचानक सगळं संपलं. डॅमरेल हे सर्व सहन करू शकली नाही आणि तिने आत्महत्या केली. पोलिसांनी आणि त्याच्या मित्रांनी या घटनेला संशयास्पद आत्महत्या मानले आहे, ज्याचे कारण तिचे अलिकडेच झालेले ब्रेकअप असल्याचे म्हटले जात आहे.
Jade Damarell, 32, an experienced parachutist hailed as extraordinary, plummeted to her tragic death with no trace of equipment failure, an inquest hears, fueling grim suspicions of suicide as a deliberate act.
So why did a pretty, young, sound middle-class woman, who seemed… pic.twitter.com/na40cEIjLH
— Xaldwin Sealand (@XaldwinSealand) May 22, 2025
माहितीनुसार, ब्रेकअपच्या अवघ्या एक दिवसांतच तिने हे पाऊल उचलले. दोघेही एकमेकांना सहा महिन्यांहून अधिक काळ डेट करत होते. जेडने डरहममधील शॉटन कोलियरी येथील रेफर्ड्स फार्ममधून उडी मारली, जिथे उतरल्यानंतर ती मृतावस्थेत आढळली. वृत्तानुसार, जेडच्या मित्रांनी सांगितले की पोलिसांना एक चिठ्ठी सापडली ज्यामध्ये जेडने तिच्या ब्रेकअपचा उल्लेख केला होता. स्काय हाय स्कायडायव्हिंग सेंटरनेही या घटनेचे वर्णन “जाणूनबुजून केलेले कृत्य” असे केले. तपासात तिच्या पॅराशूट उपकरणांमध्ये कोणताही दोष आढळला नाही, ज्यामुळे हे स्पष्ट झाले की झेडने स्वतःहुन पॅराशूट उघडले नाही आणि ती मृत्यूला बळी पडली.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.