Anaconda VS Python: पाण्याच्या राक्षसाचा गळा पकडून ॲनाकोंडा करू लागला शिकार; भयानक दृश्य अन्... Video Viral
सोशल मीडियावर नेहमीच अनेक वेगवेगळे व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे बऱ्याचदा प्राण्यांच्या जीवनाशी निगडित देखील व्हिडिओ शेअर केले जातात. हे व्हिडिओ कधी मजेदार असतात तर कधी धक्कादायक… काही व्हिडिओतील दृश्ये तर इतकी थरारक असतात की त्यांना पाहताच आपल्या अंगावर काटा येतो. अशीच एक शिकार सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे मात्र ही शिकार कोणत्या जंगलात झाली नसून ही शिकार पाण्याच्या आत घडून आली. यात पाण्यातील दोन शिकार एकमेकांविरुद्ध लढताना आणि एकमेकांची शिकार करताना दिसून आले. यात ॲनाकोंडा मगरीचा गळा देखील पकडतो ज्यानंतर हे दृश्य आणखीनच रोमांचित वळण घेते. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चला यात काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
मगर आणि अजगर हे दोघेही जंगलातील सर्वात धोकादायक शिकारी म्हणून ओळखले जातात. अशात त्याच्या वाटेल चुकूनही कुणी जात नाही अशात हेच प्राणी जर आमने-सामने आले तर काय होईल याचा विचार करा… व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये पाण्यामध्ये एक अजगर आणि मगर असल्याचे दिसून येते. यावेळी अजगराने मगरीवर पूर्ण ताबा मिळवला असून मगरीने आपले संपूर्ण नियंत्रण हरवल्याचे दिसून येते. व्हिडिओमध्ये असे दिसून येते की दोघेही अचानक पाण्याजवळ समोरासमोर येतात. सुरुवातीला वातावरण शांत असते, पण काही सेकंदातच अजगर लगेच हल्ला करतो. महाकाय अजगर मगरीला आपल्या मुठीत धरतो आणि नंतर त्याची मान घट्ट धरतो. मगर संघर्ष करते, पण अजगराची पकड इतकी मजबूत असते की तो स्वतःला सोडवू शकत नाही.
व्हायरल व्हिडिओमध्ये असे दिसून येते की अजगर हळूहळू मगरीवर मात करत आहे. या धोकादायक पाण्यातील शिकारी, मगरीलाही अजगरासमोर कमकुवत दाखवण्यात आले आहे. हे पाहून आश्चर्य वाटते की ज्याला लोक सर्वात शक्तिशाली आणि धोकादायक मानतात, तो देखील या महाकाय सापासमोर असहाय्य झाला. तथापि, हा व्हिडिओ एआयद्वारे बनवल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. असे दिसते की हा व्हिडि ओ आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या मदतीने तयार करण्यात आला आहे, ज्यामुळे तो आणखी रोमांचक दिसून येत आहे.
अजगर-मगरीच्या शिकारीचा हा व्हिडिओ @wildanimalnature नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘अजगराने मगरीचे डोके कुरतडले’ असे लिहिले आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले असून अनेकांनी याच्या कमेंट सेक्शनमध्ये या शिकारीवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “सर्व सापांना मारून टाका, मला साप आवडत नाहीत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हा AI व्हिडिओ आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.