आनंद महिंद्रा यांनी केले ट्रॅफिक पोलिसाचे कौतुक; व्हिडिओ शेअर करून म्हणाले
सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. कलाकारांसाठी तर सोशल मीडिया एक प्लॅटफॉर्म बनले आहे. अनेकजण सोशल मीडियावर आपल्या कामाच्या देखील व्हिडीओ पोस्ट करत असतात. असे व्हिडीओ पाहून आपल्याला आनंद तर होतोच पण कौतुकही वाटते. असे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केले जातात. सध्या असाच एक कौतुकास्पद व्हिडीओ व्हायरल होत आहे.
आनंद महिंद्रा हे नाव तुम्ही सर्वांनी ऐकले असेल. आनंद महिंद्रा हे प्रसिद्ध भारतीय उद्योगपती आणि महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आहेत. आपल्या व्यवसायाव्यतिरिक्त आनंद महिंद्रा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही खूप सक्रिय असतात. दर काही दिवसांनी, ते त्यांना आवडलेले कौतुकास्पद असे व्हिडिओ किंवा पोस्ट शेअर करत राहतात. त्यांना वाटते की ते शेअर केल्याने लोकांमध्ये काही बदल होऊ शकतो. आजही त्यांनी सकाळी त्यांनी ‘मंडे मोटिव्हेशन’ साठी एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ एका ट्रॅफिक पोलिसाचा आहे.
व्हायरल व्हिडिओ
रस्त्यावरून जाताना तुम्ही अनेक वाहतूक पोलीस पाहिले असतील जे तिथे त्यांचे काम करण्यासाठी तैनात असतात. पण बर्याचवेळा सगळे शांतपणे उभे असलेले तुम्ही पहिले असतील. काहीच ट्रॅफिक पोलिस मेहनतीने काम करताना दिसतात. सध्या अशाच एका ट्रॅफिक पोलिसाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जो तुम्हाला खूप आवडेल. ट्रॅफिक पोलीस अतिशय अनोख्या पद्धतीने डान्स करत ट्रॅफिक कंट्रोल करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यामुळेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आनंद महिंद्रा यांनी मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘या पोलिसाने हे सिद्ध केले आहे की कंटाळवाणे काम नाही. तुम्हाला जे काही करायचे आहे ते तुम्ही करू शकता.’
This cop proves that there is NO such thing as boring work.
It is whatever you choose to make of it.#MondayMotivation
— anand mahindra (@anandmahindra) July 29, 2024
नेटकऱ्याच्या प्रतिक्रिया
हा व्हिडिओ आत्तापर्यंत 1 लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे.व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले – ‘तुमचे काम तुम्हाला आनंदी आणि यशस्वी बनवते.’ दुसऱ्या युजरने लिहिले – ‘तुम्हाला तुमच्या कामाची प्रचंड आवड आहे.’ तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले – ‘कामाचा आनंद घेणारे लोक पाहून आनंद झाला.’