काकींचा विषयच हार्ड ए...! रस्ता पार करण्यासाठी थेट काकांना घेतलं कुशीत अन् युजर्स म्हणाले, "बायको हवी तर अशी"; Video Viral
इंटरनेटवर कधी काय दिसून येईल याचा नेम नाही. इथे नेहमीच अनेक अजब-गजब व्हिडिओज व्हायरल होत असतात. यातील दृश्ये कधी आपलं हसू अनावर करतात तर कधी आपल्याला थक्क करुन सोडतात अशातच आता सोशल मिडियावर एक अनोखा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्याने सर्वांनाच आनंदीत केलं आहे. व्हिडिओमध्ये काकूंच काकांवरील प्रमे दिसलं जे पाहून सर्वांचाच ऊर भरुन आला. वास्तविक यात एक महिला पाण्याने भरलेला रस्ता पार करण्यासाठी आपल्या पतीला स्वत:च्या खांद्यांवर उचलून रस्ता पार करताना दिसली जे पाहून सर्वत आश्चर्यचकीत झाले. काहींनी त्याच्या ताकदीची प्रशंसा केली तर काहींनी त्यांच्या प्रेमाची मिसाल लोकांना देऊ पाहीली. चला व्हिडिओत काय दिसलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय दिसलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला आणि तिचा पती रस्त्याच्या कडेला उभे असल्याचे दिसते. त्यांच बोलण पूर्ण झाल्यानंतर ते रस्ता पार करण्यासाठी पुढे जातात पण पुढचा रस्ता पाण्याने भरलेला असतो, जे पाहून महिला लगेच आपल्या नवऱ्याला कडेवर घेते आणि त्याला घेऊनच रस्ता पार करु लागते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे नवराही मोठ्या थाटात तिच्या कमरेवर बसून तिच्यासोबत रस्ता पार करण्यासाठी आपली संमती दर्शवतो. जोडप्याचा हा अनोखा व्हिडिओ आता सोशल मिडियावर सर्वांनाच अचंबित करत असून यातील हा सर्व प्रकार पाहून सर्वच त्यांच्या प्रमाचे काैतुक करत आहेत. व्हिडिओवर अनेक मजेदार कमेंट्सदेखील आल्या आहेत ज्यावरुन यूजर्सना हा व्हिडिओ खरोखरच कीती आवडला आहे ते समजते.
हा व्हायरल व्हिडिओ @cute_indian_videos नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मी माझ्या आवडीच्या महिलेसोबत असताना” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कोण जग, कोण ४ लोक” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “क्यूट काका आणि काकू”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.