(फोटो सौजन्य: X)
लहानपणी आपण सर्वांनी च्युइंगम नक्कीच खाल्लं असेल. बाजारात अनेक फ्लेवर्सचे च्युइंगम आहेत जे चघळून त्यांचा आनंद लुटला जातो पण हे च्युइंगम कधीही पूर्णपणे खाल्ले किंवा गिळले जात नाही. हे आपल्या आरोग्यासाठी धोक्याचे आहे. अशातच आता एक व्हिडिओ सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे ज्यात एका मुलीने च्युइंगम चुकीने गिळून टाकल्याची घटना घडून आली आहे. केरळमधील कन्नूर येथील ही घटना असून सायकल चालवत असताना मुलीसोबत ही घटना घडली. मुलीचा जीव गुदमरला होताच पण याचवेळी काही तरुणांनी मिळून तिला यातून सुखरुप वाचवले. याचा व्हिडिओ इंटरनेटवर शेअर करण्यात आला असून यूजर्सद्वारे आता तरुणांचे काैतुक केले जात आहे. चला व्हिडिओतील सर्व घटना सविस्तर जाणून घेऊया.
नक्की काय घडलं?
व्हायरल व्हिडिओमध्ये एक ७ वर्षांची मुलगी तिच्या सायकलवर उभी असल्याचे दिसते. यावेळी काही तरुण छोट्या टेम्पोमध्ये काही सामान भरण्यात मग्न होते. दोन तरुण दुचाकीवर बसून कुठेतरी जात असतात आणि याचवेळी मुलगी अस्वस्थ होऊन त्यांच्याजवळ जाते. मुलीच्या तोंडात च्युइंगम अडकल्याने ती जरा अस्वस्थ झालेली असते. तिला अशा अवस्थेत पाहताच सर्व तरुण मिळून तिची मदत करण्याता निर्णय घेतात. ते तिचं डोक खाली करुन आणि तिच्या पाठीवर थाप मारुन हा च्युइंगम बाहेर करण्याचा प्रयत्न करतात ज्यात ते यशस्वीही होतात. काहीवेळाच्या संघर्षानंतर हा च्युइंगम यशस्वीरीत्या बाहेर पडतो. तरुणांच्या या मदतीने वेळीच मुलीचा जीव वाचला अन्यथा मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता होती.
‘When strangers became heroes’ An eight-year-old girl in Kerala was saved by a group of young men after she began choking on Chewing Gum. The child approached them feeling unwell, and they quickly helped her expel the gum. This should go viral. ❤️ pic.twitter.com/lIbQY9Jcsf — Gabbar (@Gabbar0099) September 21, 2025
दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @CyberRobooo नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “आपण त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. त्यांनी जे केले आहे ते खूप छान आहे. पण उघडी ड्रेनेज सिस्टीम देखील एक मोठा धोका आहे आणि मला ते सर्वत्र दिसते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “वेळेवर प्रतिक्रिया आणि सतर्कतेमुळे एकाचा जीव वाचला.. त्या मुलांचे कौतुक” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मुलाने मदत मागितली ते बरोबर होते”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.