Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bengaluru Woman’s September Expenses: मासिक खर्चाचा हिशोब पाहून कॉर्पोरेट तरुणी हादरली; आकडा पाहताच बसला धक्का!

Bengaluru Woman’s September Expenses: बंगळुरूमध्ये राहणाऱ्या २६ वर्षीय कॉर्पोरेट कर्मचारी शिवांजलीने सप्टेंबर महिन्यातील आपल्या खर्चाचा संपूर्ण हिशोब सोशल मीडियावर शेअर केला. एका महिन्यात तिचा एकूण खर्च ६३ हजार रुपये झाला

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 05, 2026 | 12:23 PM
Bengaluru Woman’s September Expenses (फोटो सौजन्य- AI)

Bengaluru Woman’s September Expenses (फोटो सौजन्य- AI)

Follow Us
Follow Us:
  • शिवांजलीचा सप्टेंबर महिन्याचा एकूण खर्च ६३ हजार रुपये झाला.
  • भाडे आणि मेंटेनन्ससाठी तिच्या वाट्याला २५ हजार रुपये आले.
  • Swiggy-Zomato, बाहेरचे जेवण आणि इतर फूड खर्चावर १२ हजार रुपये गेले.
बंगळुरू सारख्या शहरात नोकरी करणं म्हणजे वाटते तरी सोप्पी गोष्ट नाहीये. तिथे जगणं तितकचं महाग आहे. महिन्याच्या एक तारखेला पगार जमा होतो आणि एक-दोन आठवड्यात खिसा रिकामा होतो. पैसे कुठे जातात हे समजत नाही. असाच काहीसा अनुभव बंगळुरूमध्ये राहणाऱ्या एका 26 वर्षाच्या मुलीला आला. तिने सप्टेंबर महिन्यात किती खर्च केला आणि याचा पूर्ण हिशोब इंस्टाग्रामवर टाकला. ते पाहून लोकांचे पांढरे झाले आहेत. एका महिन्यात तिने 63 हजार रुपये खर्च केले आहेत. Bengaluru Woman’s September Expenses:

कोण आहे ही मुलगी?

या मुलीचं नाव शिवांजली आहे. ती बंगळुरूमध्ये एका कॉर्पोरेट कंपनीत काम करत तिने एक व्हिडीओ बनवला. त्यात तिने लिहिलंय – “सप्टेंबर मधला माझा खर्च. बंगळुरूमध्ये राहणारी 26 वर्षांची कॉर्पोरेट मुलगी “तिने आपल्या व्हिडीओमध्ये एक-एक रुपयाचा हिशोब दिला आहे. भाड्यापासून ते स्विगी पर्यंत सगळं सांगितलंय.

सगळ्यात जास्त पैसा घरावरच जातो

शिवांजली तिच्या कॉलेजच्या दोन मैत्रिणींसोबत एका 3BHK फ्लॅटमध्ये राहते. तिघींमध्ये भाडं वाटलं जातं. तरी पण तिचा एकटीचा वाटा 25 हजार रुपये येतो. यात मेंटेनन्स पण आला. म्हणजे कमवलेल्या पैशातले जवळपास 40 टक्के पैसे फक्त डोक्यावर छत ठेवण्यासाठी जातात. बंगळुरूमध्ये घरं किती महाग आहेत याचा हा पुरावा आहे.

जेवणाचा खर्च ऐकून तर चक्कर येईल

ती सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण ऑफिसमध्येच करते. त्यामुळे तिथे तिचे पैसे वाचतात. रात्रीसाठी त्यांनी स्वयंपाकाला घरी एक मावशी ठेवली आहे . त्याचा खर्च सगळ्या मैत्रिणी मिळून देतात. त्यामध्ये शिवांजलीच्या हिस्साला 2 हजार रुपये, तसेच घराला लागणारा किराणासाठी आणखीन तीन हजार लागतात.

Viral News: ऐकावे ते नव्वलचं! नवरा हवा म्हणून थेट Google Form! ३६ वर्षीय महिलेच्या पोस्टला २४० हून अधिक प्रतिसाद

पण खरी गोळी तर बाहेरच्या जेवणात आहे. ऑफिसमध्ये जेवून जे पैसे वाचवले ते सगळे स्विगी आणि झोमॅटोवर गेले. बाहेर हॉटेलमध्ये जाणं आणि घरी जेवण मागवणं यातच तिचे 12 हजार रुपये गेले. हा भाड्यानंतरचा सगळ्यात मोठा खर्च आहे. सहज म्हणून ॲप उघडायचं आणि ऑर्डर टाकायची, या सवयीमुळे महिन्याच्या शेवटी मोठं बिल झालं. म्हणजे फक्त जेवणावरच तिचे जवळपास 17 हजार रुपये गेले.

गाडी, मोलकरीण आणि बाकीचे खर्च

घर साफ करायला त्यांनी एक मदतनीस ठेवली आहे. त्यासाठी तिला 1 हजार द्यावे लागतात.येण्या-जाण्यासाठी ती स्वतःची बाईक वापरते. सप्टेंबरमध्ये पेट्रोलसाठी 3 हजार गेले. ज्या दिवशी बाईक नसते तेव्हा ती ऑटो किंवा कॅबने जाते. त्यासाठी अजून 4 हजार खर्च झाले. म्हणजे प्रवासाचा एकूण खर्च 7 हजार झाला.

दिसत नाहीत पण पैसे कापणारे खर्च

आजकाल सगळ्यांचे असे काही खर्च असतात जे आपल्याला दिसत पण नाहीत आणि दर महिन्याला खात्यातून पैसे कापले जातात. शिवांजलीचे असे 6 हजार रुपये गेले. यात ओटीटी म्हणजे नेटफ्लिक्स, हॉटस्टार, आयक्लाऊड, काही एआय टूल्स यांचे पैसे आहेत. आपण कशाचं सब्सक्रिप्शन घेतलंय हेच बऱ्याचदा लक्षात नसतं, पण पैसे मात्र जात असतात.

Viral Video: ना अडखळता, ना चुकता! परदेशी नागरिकाची हनुमान चालिसा ऐकून सगळ्यांना लागला 440 शॉक

शॉपिंगचा वेगळाच हिशोब

शेवटी राहिली शॉपिंग. कपडे, मेकअपचं सामान आणि इतर छोट्या मोठ्या गोष्टी घेतल्यावर तिचे 7 हजार रुपये तिथे गेले.सगळं मिळून हिशोब केला तर 63 हजार रुपये झाले. हा आकडा पाहून शिवांजली स्वतःच घाबरली. ती म्हणाली, मला पण वाटलं नव्हतं की एवढा खर्च झाला असेल.पण एक चांगली गोष्ट झाली की तिला कळलं तरी की पैसे कुठे चालले आहेत. तज्ज्ञ पण हेच सांगतात की आधी खर्च लिहून काढा, तरच बचत करता येईल. जोपर्यंत हिशोबच माहीत नाही तोपर्यंत पैसे वाचवणं शक्य नाही.

Web Title: Bengaluru corporate employee shivanjali september expenses 63000 rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 12:23 PM

Topics:  

  • shocking video viral
  • viral news
  • Viral News update

संबंधित बातम्या

छोरियां छोरों से कम हैं के? तब्बल १० फूटाच्या अजगराला महिलेने फरफटत नेलं गावाबाहेर; VIDEO पाहून यूजर्स म्हणाले, नारी सब पे भारी
1

छोरियां छोरों से कम हैं के? तब्बल १० फूटाच्या अजगराला महिलेने फरफटत नेलं गावाबाहेर; VIDEO पाहून यूजर्स म्हणाले, नारी सब पे भारी

मैत्रीला तोड नाही! आपल्या साथीदाराला वाचवण्यासाठी ‘डॉग कॅचर’वर तुटून पडला श्वान; भावनिक Video Viral
2

मैत्रीला तोड नाही! आपल्या साथीदाराला वाचवण्यासाठी ‘डॉग कॅचर’वर तुटून पडला श्वान; भावनिक Video Viral

व्ह्यूज अन् लाईक्ससाठी काहीही! रेल्वे स्टेशनवर कोल्ड ड्रिंकने अंघोळ करून बनवत होती रील, RPF ने केली कारवाई; Video Viral
3

व्ह्यूज अन् लाईक्ससाठी काहीही! रेल्वे स्टेशनवर कोल्ड ड्रिंकने अंघोळ करून बनवत होती रील, RPF ने केली कारवाई; Video Viral

गुवाहटीच्या नाइटक्लबमध्ये धक्कादायक प्रकार! महिलेला विवस्त्र करून निर्दयपणे पुरुषांनी केली मारहाण; घटनेचा Video Viral
4

गुवाहटीच्या नाइटक्लबमध्ये धक्कादायक प्रकार! महिलेला विवस्त्र करून निर्दयपणे पुरुषांनी केली मारहाण; घटनेचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.