Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Odisha News Viral : भूस्खलनात बेपत्ता, 14दिवसांनी सापडले! मेंढपाळामुळे शिक्षकाला मिळाले जीवदान

Odisha News Viral : ओडिशातील कंधमाल जिल्ह्यात भूस्खलनामुळे बेपत्ता झालेले शिक्षक मोहन महाराणा तब्बल 14 दिवस डोंगराजवळील खोल खड्ड्यात अडकून पडले होते. अन्न आणि स्वच्छ पाण्याविना त्यांनी गढूळ पाणी पिऊन आपला जीव वाचवला. शनिवारी एका मेंढपाळाला त्यांचा आवाज ऐकू आला आणि गावकऱ्यांच्या मदतीने त्यांची सुटका करण्यात आली.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 17, 2026 | 10:01 PM
Odisha Teacher Survives 14 Days in Landslide Pit, Rescued by Shepherd in Kandhamal ( ओडिशामधील कंधमाल येथे भूस्खलनाच्या खड्ड्यात १४ दिवस अडकलेल्या शिक्षिकेची एका मेंढपाळाने सुटका केली.)

Odisha Teacher Survives 14 Days in Landslide Pit, Rescued by Shepherd in Kandhamal ( ओडिशामधील कंधमाल येथे भूस्खलनाच्या खड्ड्यात १४ दिवस अडकलेल्या शिक्षिकेची एका मेंढपाळाने सुटका केली.)

Follow Us
Follow Us:
  • पाय घसरल्याने ते डोंगराजवळील एका खोल खड्ड्यात पडले  
  • मेंढपाळाने शिक्षकाचा आवाज ऐकला  
  • यावर शिक्षक काय म्हणाले 
Odisha News Viral : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातून एक मोठी घटना समोर येतेय. जी सर्वांना धक्का देईल. भूस्खलनादरम्यान बेपत्ता झालेले एका शाळेचा शिक्षक 14 दिवस डोंगराजवळील एका खड्ड्यात अडकला होता. या काळात त्यांच्याकडे अन्न आणि पिण्याचे स्वच्छ पाणी देखील नव्हते.

मिळालेल्या माहितीनुसार, ते खड्ड्यातील गढूळ पाणी पिऊन कसेतरी वाचले आहेत. अखेरीस, शनिवारी एका मेंढपाळाने त्यांना पाहिले, त्यानंतर गावकऱ्यांनी त्यांची सुखरूप सुटका केली. मिळालेल्या माहितीनुसार, या शिक्षकाचे नाव मोहन महाराणा आहे. ते रायकिया ब्लॉकच्या इंद्रगड पंचायतीतील एका शाळेत शिकवतात. शनिवारी, भूस्खलनग्रस्त डांगसी गावाजवळील डोंगराजवळील एका खड्ड्यात ते अडकलेले आढळले.

An extraordinary story of survival from Odisha! A schoolteacher swept away during Cyclone Arnab has been rescued alive in Kandhamal after surviving nearly 15 days in a remote forest without food. Mohan Maharana, 47, was found in a ditch near landslide-hit Dangasi village after a cattle herder heard his faint cries and alerted villagers. With no access to food or clean drinking water, he survived by drinking muddy rainwater. The breakthrough came when a cattle herder heard his faint cries and alerted villagers. After being rescued, villagers carried him on a makeshift stretcher for nearly 18 km to Raikia Hospital. A remarkable fight for survival. Praying for his speedy recovery! — Manas Muduli (@manas_muduli) November 15, 2026

पाय घसरल्याने ते डोंगराजवळील एका खोल खड्ड्यात पडले

मिळालेल्या माहितीनुसार, 29 ऑक्टोबरच्या रात्री झालेल्या मुसळधार पाऊस होता. परिसरात मोठे भूस्खलन झाले होते. गावातील डोंगराचा काही भाग कोसळल्याने डांगसी गाव पूर्णपणे उद्वस्थ  झाले.गावकऱ्यांनी जीव वाचवण्यासाठी जवळच्या दुबा गावात पलायन केले.या दरम्यान, मोहन महाराणा डांगासी गावाच्या दिशेने चालत होते.अचानक भूस्खलन झाल्याने आणि अंधारात त्यांचा पाय घसरल्याने ते डोंगराजवळील एका खोल खड्ड्यात पडले. जवळपास कोणीही नव्हते, त्यामुळे मदतीसाठी मारलेली त्यांची हाक कोणी ऐकली नाही. दुसऱ्या दिवशी सततच्या पावसामुळे आणि खराब हवामानामुळे त्यांचा आवाज क्षीण झाला. जंगल आणि डोंगराळ भागात अडकल्यामुळे त्यांना कोणीही शोधू शकले नाही.

मेंढपाळाने शिक्षकाचा आवाज ऐकला

भूस्खलनानंतर, हवामान सामान्य झाल्यावर, कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. ते न सापडल्याने, त्यांनी रायकिया पोलिसांशी संपर्क साधला. हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आणि शोधमोहीम सुरू करण्यात आली. तथापि, अनेक प्रयत्न करूनही त्यांचा ठावठिकाणा लागला नाही.

शनिवारी, एक मेंढपाळ आपल्या गुरांसह त्या परिसरात आला. त्याला खड्ड्यातून एक अस्पष्ट आवाज ऐकू आला. जेव्हा तो आवाजाच्या दिशेने गेला, तेव्हा त्याला मोहन महाराणा खड्ड्यात अडकलेले दिसले. त्याने तात्काळ गावकऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर गावकरी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी शिक्षकाला बाहेर काढले. त्यांना तात्काळ वैद्यकीय मदतीची गरज होती. त्यांनी एक तात्पुरते स्ट्रेचर तयार केले आणि त्याला सुमारे १८ किलोमीटर पायी रायकिया हॉस्पिटलपर्यंत घेऊन गेले. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, ओडिशामधील भूस्खलनामुळे रेल्वे वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला होता आणि १३ ते २२ ऑक्टोबर दरम्यान अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या.

Meerut CCTV Viral Video : लायटर लावला अन् साडीच्या दुकानाने घेतला पेट; CCTV पाहून व्यापारीही हादरले

यावर शिक्षक काय म्हणाले

या संपूर्ण घटनेबद्दल शिक्षक मोहन महाराणा म्हणाले, “मी सुंथिया येथे राहत होतो. त्या संध्याकाळी मी जेवण बनवत असताना मला कोणीतरी हाक मारत असल्याचे जाणवले. मी बाहेर येताच मला सर्वत्र पाणीच पाणी दिसले. जणू काही पूरच आला होता. सगळीकडे पूर्ण अंधार होता. मी कुठे जात आहे किंवा काय झाले आहे, हे मला समजत नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मला शुद्ध आली, तेव्हा मी स्वतःला नदीच्या कोरड्या भागात पाहिले.

आजूबाजूला दगडांचे ढीग होते आणि जवळच फक्त झऱ्याचे पाणी वाहत होते. मी सुमारे 15 दिवस गदुळ पाण्यावर दिवस काढले. मी अनेक वेळा मदतीसाठी लोकांना हाक मारली, पण माझ्या आवाजाकडे कोणी लक्ष दिले नाही. मी संपूर्ण वेळ शुद्धीत होतो, पण मला तिथून बाहेर पडता आले नाही. मला परत जाण्याचा मार्ग सापडला नाही.

ते ठिकाण दुबा गावापासून सुमारे तीन ते चार किलोमीटर अंतरावर, घनदाट जंगलात होते. मी गेल्या दोन वर्षांपासून या भागात राहत आहे, पण मी यापूर्वी असा मुसळधार पाऊस कधीही अनुभवला नव्हता. आता माझी प्रकृती बरी आहे.” असे वृत्त आहे की, दीर्घकाळच्या उपासमारीमुळे आणि गढूळ पाणी प्यायल्यामुळे त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर झाली होती. ते सध्या रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 14 दिवसांच्या मृत्यूशी झुंजीनंतर मोहन महाराणा बरे झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना आणि गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Suryakumar Yadav Viral Video : मैदानावर स्टार, जेवणात साधेपणा ! सूर्यकुमार यादव-सरफराज खानचा मटण पार्टीचा VIDEO व्हायरल

Web Title: Odisha teacher survives 14 days in landslide pit kandhamal rescue sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 10:01 PM

Topics:  

  • odisa
  • viral
  • viral news

संबंधित बातम्या

Geyser Blast in Kitchen : किचनमध्ये गीझरचा भीषण स्फोट! व्हिडिओ व्हायरल; तुमच्या घरातही असा धोका तर नाही, जाणून घ्या सुरक्षेचे नियम
1

Geyser Blast in Kitchen : किचनमध्ये गीझरचा भीषण स्फोट! व्हिडिओ व्हायरल; तुमच्या घरातही असा धोका तर नाही, जाणून घ्या सुरक्षेचे नियम

Udaipur Viral Video : उदयपूरमध्ये महिला यूट्यूबरचा छळ ! One Lip Kiss Please म्हणारा आरोपी आफताब ऊर्फ गब्रूचा माफीनामा व्हायरल
2

Udaipur Viral Video : उदयपूरमध्ये महिला यूट्यूबरचा छळ ! One Lip Kiss Please म्हणारा आरोपी आफताब ऊर्फ गब्रूचा माफीनामा व्हायरल

Pushkar Cattle Fair Viral Video : ढोलाचा आवाज ऐकताच म्हैस संतापली! दोन घोड्यांना पाडले, जीपचेही नुकसान; व्हिडिओ व्हायरल
3

Pushkar Cattle Fair Viral Video : ढोलाचा आवाज ऐकताच म्हैस संतापली! दोन घोड्यांना पाडले, जीपचेही नुकसान; व्हिडिओ व्हायरल

Uttar Pradesh viral video : मृत्यूची वाट न पाहता 80 वर्षीय आजोबांनी स्वतःच घातला तेराव्याचा घाट? व्हिडिओ व्हायरल
4

Uttar Pradesh viral video : मृत्यूची वाट न पाहता 80 वर्षीय आजोबांनी स्वतःच घातला तेराव्याचा घाट? व्हिडिओ व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.