Bihar Chief Minister Nitish Kumar's video of insulting the national anthem goes viral
बिहार : बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार हे अनेकदा त्यांच्या वागण्यामुळे आणि वक्तव्यामुळे चर्चेत असतात. नीतीश कुमार हे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. सध्या त्यांची सोशल मीडियावर तुफान व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये नीतीश कुमार हे राष्ट्रगीत सुरु असताना गप्पा मारत आहेत. यामुळे ते पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्याच्यावर राजकीय वर्तुळातून देखील जोरदार टीका केली जात आहे. तसेच नीतीश कुमार यांच्याविरोधात केस देखील दाखल करण्यात आली आहे.
नीतीश कुमारांकडून यापूर्वी देखील महात्मा गांधी यांचा अपमान करण्यात आला होता. त्यानंतर आता राष्ट्रगीताचा अपमान करण्यात आला आहे. पाटण्यातील पाटलीपुत्र क्रीडा संकुलात एका क्रीडा कार्यक्रमात नीतीश कुमार सहभागी झाले होते. यावेळी राष्ट्रगीत सुरू होताच नितीश कुमार हे हसू लागले आणि शेजारी उभ्या असणाऱ्या त्यांचे प्रधान सचिव दीपक कुमार यांच्याशी गप्पा मारु लागले. नीतीश कुमार हे हसताना आणि बोलताना कॅमेऱ्यात कैद झाले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा आरोप केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी नितीश कुमारांवर जोरदार हल्लाबोल केला. सोशल मीडियावर त्यांनी व्हिडिओ शेअर करत नीतीश कुमार यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, ‘माननीय मुख्यमंत्री, किमान कृपया राष्ट्रगीताचा अपमान करू नका. तुम्ही दररोज तरुण, विद्यार्थी, महिला आणि वृद्धांचा अपमान करता. कधी ते महात्मा गांधींच्या हौतात्म्याची थट्टा त्यांच्या शहीद दिनी टाळ्या वाजतात, तर कधी राष्ट्रगीत सुरू असताना टाळ्या वाजवतात! ‘तुम्ही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या स्थिर नाही आहात. काही सेकंदही शांत राहू शकत नाही. बिहारचा पुन्हा पुन्हा अपमान करू नका,” अशी टीका तेजस्वी यादव यांनी केली आहे.
कम से कम कृपया राष्ट्र गान का तो अपमान मत करिए मा॰ मुख्यमंत्री जी।
युवा, छात्र, महिला और बुजुर्गों को तो आप प्रतिदिन अपमानित करते ही है।
कभी महात्मा गांधी जी के शहादत दिवस पर ताली बजा उनकी शहादत का मखौल उड़ाते है तो कभी राष्ट्रगान का!
PS: आपको याद दिला दें कि आप एक बड़े प्रदेश… pic.twitter.com/rFDXcGxRdV
— Tejashwi Yadav (@yadavtejashwi) March 20, 2025
मुख्यमंत्री, नितीश कुमार त्यांचे प्रधान सचिव दीपक कुमार यांच्यासोबत स्टेजवर उभे होते. राष्ट्रगीत सुरू असताना तो हसत त्यांच्याशी बोलत असल्याचे दिसून आले. एकदा तर त्याने हात जोडून प्रेक्षकांना अभिवादन केले. आयएएस अधिकारी दीपक कुमार यांना बाही ओढताना दिसले. ते त्यांना गप्प राहण्याचा इशारा देत होता. हा व्हिडिओ व्हायरल होताच विरोधकांनी नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली. तसेच त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
वकील सूरज कुमार यांनी मुझफ्फरपूर एसीजेएम वेस्टर्न कोर्टात खटला दाखल केला आहे. राष्ट्रगीताचा अपमान केल्याच्या आरोपाखाली मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर आरोप करताना वकील सूरज कुमार म्हणाले की, 20 मार्च रोजी सेपाकत्र विश्वचषक सामन्याच्या उद्घाटनादरम्यान राष्ट्रगीत लावले होते. भारतीय दंड संहितेच्या कलम २९८, ३५२ आणि राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायद्याच्या कलम २, ३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रगीताचा अपमान करणे हे कोणासाठीही अक्षम्य गुन्हा आहे. यासाठी कमाल तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते. न्यायालयात पुढील सुनावणीची तारीख २८ मार्च निश्चित करण्यात आली आहे.