Photo Credit- Social Media 'मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी सरकारमधील काही मंत्रीच...';
मुंबई: नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे राज्यभरातील वातावरण तापले आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. हे सर्व सुरू असतानाच शिवसेना आमदार आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी नागपूर हिंसाचारावर गंभीर शंका व्यक्त केली आहे. नागपूर हिंसाचाराच्या घटनेमागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील काही नेते असू शकतात, अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे. राज्य सरकारमध्ये सर्व काही सुरळीत नाही. त्यामुळए “सरकारमधील काही घटक मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिमा मलिन करण्याचा कट रचत आहेत का?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस सध्या दावोस येथे असून महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, अशा प्रकारच्या हिंसाचारामुळे राज्यातील उद्योग, गुंतवणूक आणि पर्यटनावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. नागपूर हे मुख्यमंत्री फडणवीस यांचे शहर असल्यामुळे या घटनेमुळे त्यांच्या प्रतिमेलाही धक्का बसला आहे. “सरकारमध्ये काहीतरी बिनसले आहे आणि मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन करण्याचाप्रयत्न होत आहे का, याची चौकशी झाली पाहिजे,” असेही त्यांनी नमूद केले.
न्यायव्यवस्थेत भूकंप! उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांच्या घरात मिळालं घबाड; कोण आहेत यशवंत शर्मा?
नागपूर हिंसाचार प्रकरणात नवे अपडेट
नागपूर हिंसाचारातील काही संशयितांचे फोटो समोर आले असून, हे फोटो हिंसाचाराच्या पूर्वीचे असल्याचे आढळून आले आहे. नागपूरच्या शिवाजी चौकात काही संशयित दिसले होते. त्यांच्या हातात फोन होते आणि ते कोणाशी तरी संभाषण करत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट झाले आहे. काही संशयित बाईक आणि स्कूटरवर दिसले असून, त्यापैकी काहींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उर्वरित संशयितांचा शोध सीसीटीव्हीच्या मदतीने घेतला जात आहे. हिंसाचाराच्या आधी हे संशयित वेगवेगळ्या गटांमध्ये फिरताना दिसले होते, त्यापैकी काहींनी आपले चेहरे कापडाने झाकले होते.
एनआयए पथकाची नागपूर दौऱ्यावर पाहणी
राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) पथक नागपूर हिंसाचाराच्या तपासासाठी दाखल झाले आहे. सूत्रांनुसार, एनआयएच्या अधिकाऱ्यांनी हिंसाचारग्रस्त भागांची पाहणी केली असून, औरंगजेबाच्या कबरी आणि त्याच्या आसपासच्या परिसराची तपासणी केली आहे. हिंसाचारामागील कटकारस्थान उघडकीस आणण्यासाठी एनआयएकडून तपास सुरू आहे.
L & T Shares: बाजार बंद होण्यापूर्वीच एल अँड टी टेक्नॉलॉजीजची मोठी अपडेट, शेअर्समध्ये २% वाढ
दरम्यान, आज एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचारावर भाष्य करत हिंसाचार करणाऱ्यांना थेट इशारा दिला आहे.देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “या हिंसाचारामागील सूत्रधार मालेगावचा आहे. तो नागपूरला येऊन हे सर्व का करत होता?” याची चौकशी केली जाईल. ज्यांनी वातावरण बिघडवले त्यांना सोडले जाणार नाही. आम्ही विहिंप आणि बजरंग दलाच्या लोकांवरही गुन्हे दाखल केले आहेत. जर पोलिसांवरील हल्ले खपवून घेतले तर राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहणार नाही. म्हणून, आम्ही दोषींना धडा शिकवणार आहोत
नागपूर पोलिसांचा बचाव करताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, नागपूरमधील हिंसाचाराला गुप्तचर यंत्रणेचे अपयश म्हणता येणार नाही, परंतु दुपारनंतर सोशल मीडियावर जसे लक्ष ठेवले पाहिजे तसे ठेवण्यात आले नाही. सोशल मीडियावरून प्रक्षोभक पोस्ट पसरवण्यात आल्या. आमच्याकडे सोशल मीडिया मॉनिटरिंग क्षमता आहेत, परंतु त्याची सवय होण्यासाठी थोडेसे करावे लागेल. आता रस्त्यावर हिंसाचार कमी आणि सोशल मीडियाद्वारे जास्त होतो.