निळ्याशार पाण्यात पहिल्यांदाच दिसून आला 'काळा समुद्री राक्षस', दुर्मिळ दृश्य कॅमेरात कैद; Video Viral
समुद्राच्या आत खोल पाण्यात एक वेगळं जग वास्तव करत ज्याची अधिक माहिती मानवाला नाही. इथे अनेक असे जीव राहतात ज्यांचा आकार आणि रचना माणसांच्या कल्पनेपलीकडे आहे. त्यामुळे हे जीव जेव्हा आपल्या अचानक समोर येतात तेव्हा ते आपल्याला थक्क करून सोडतात. सध्या देखील अशाच एका माशाचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे ज्याला लोक आता समुद्रातील राक्षस अशी उपमा देत आहेत. याचे रंगरूप पाहता तो एका राक्षसाप्रमाणे दिसू लागतो. या माशाला पहिल्यांदाच कोणी पाहिले असावे ज्यामुळे याचा व्हिडिओ शेअर होताच तो कमी वेळात व्हायरल झाला.
वास्तविक ही एक मादी ब्लॅक सी डेव्हिल आहे, ज्याला हंपबॅक अँगलर फिश देखील म्हणतात. तर वैज्ञानिक भाषेत या माशाला मेलानोसेटस जॉन्सोनी असेही म्हणतात. हा मासा 200 ते 2000 मीटर खोलीवर राहतो. हा मासा भूतलावर पाहणे ही धक्कादायक घटना होती, मात्र तो दिसताच काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. शास्त्रज्ञांनी त्याचे मृत शरीर संशोधनासाठी संग्रहालयात पाठवले आहे, जेणेकरून हा मासा पृष्ठभागावर कसा आला हे शोधता येईल. ब्लॅक सी डेव्हिल अत्यंत उच्च दाब असलेल्या खोल समुद्राच्या वातावरणात टिकून राहतो, म्हणून तो अचानक पृष्ठभागावर येताच जगू शकत नाही.
प्रौढ ब्लॅक सी डेव्हिल किंवा ॲबिसल अँग्लरफिशला (मेलानोसेटस जॉन्सोनी) जिवंत पाहण्याची ही जगातील पहिलीच वेळ असावी, तीदेखील दिवसा उजेडात आणि समुद्राच्या पृष्ठभागावर! हा एक रहस्यमय मासा आहे. आतापर्यंत फक्त त्याच्या बालस्वरूपात किंवा मृत पाहण्यात आले पण पहिल्यांदाच याचे असे जिवंत स्वरूप लोकांना पाहायला मिळाले. याचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला असून अजूनही लोक तो मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.
या दुर्लभ माशाचा व्हिडिओ @jara.natura नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला 4 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले असून अनेकांनी यावर कमेंट्स करत या व्हिडिओवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “ओएमजी” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तो मेला हे खरे आहे का? ” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हा मानवासाठी इशारा आहे, जगात बदल झाले आहेत, लहान प्राणी आपल्याला चेतावणी देत आहेत”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.