(फोटो सौजन्य: Twitter)
लग्नसमारंभातील एका घटनेने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ माजवला आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊ पारा येथील बुद्धेश्वर एमएम लॉनमध्ये सुरू असलेल्या लग्नसमारंभात अचानक एका बिबट्याने एंट्री घेतली. त्याला पाहताच वर्हाडी मंडळी घाबरली आणि तिथे एकच खळबळ उडाली. बिबट्याला पाहताच तेथे उपस्थित लोकांमध्ये आरडाओरडा झाला आणि ते जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावू लागले आणि पळत रस्त्यावर पोहोचले. घटनेनंतर पोलिस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही पोलीस कर्मचारी दिसतील. यावेळी त्यांच्या हातात सुरक्षा बंदुक देखील आहेत. बिबट्याला पकडण्यासाठी आलेले हे पोलीस पुढेंच्याच क्षणी हॉलच्या वरच्या दिशेने त्याला शोधण्यासाठी जातात. ते पायऱ्या चढत असतानाच समोरून अचानक बिबट्या येतो आणि त्यातील एका पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला चढवतो. यामुळे पोलीस जखमी होतो. बिबट्याचा हा हल्ला इतका वेगवान आणि भीषण असतो की ते पाहून बाकीचे पोलीस कर्मचारीही घाबरून खाली पळत सुटतात. नंतर ते हॉलचे मुख्य गेट बंद करतात.
काही वेळाने सीओ बाजार खला यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पुन्हा बिबट्याच्या शोधात पुढे सरसावले असता बिबट्याने पुन्हा हल्ला केला. यात हल्ल्यातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वनविभागाच्या पथकाने लॉनमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवून लॉन आणि परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे. तसेच खबरदारी म्हणून वनविभागाच्या पथकाने आसपासच्या लोकांना घरातच राहून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
लखनऊ में एक शादी समारोह में तेंदुआ घुस आया। उस पर क़ाबू पाने वन विभाग और पुलिस की टीम सीढ़ियां चढ़ रहीं थीं तो फिर तेंदुए कैसे राइफ़ल छीना, देखिएगा
— Umashankar Singh उमाशंकर सिंह (@umashankarsingh) February 12, 2025
दरम्यान या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ @umashankarsingh नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘लखनौमध्ये एका लग्न समारंभात बिबट्या घुसला. त्याला आटोक्यात आणण्यासाठी वनविभाग आणि पोलिसांचे पथक पायऱ्या चढत होते, मग बघा कशी बिबट्याने रायफल हिसकावली’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “एकतर बिबट्या मानवी हद्दीत शिरला आहे किंवा मानव त्यांच्या हद्दीत घुसला आहे, याचाही विचार करा” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “वनविभागाचे लोक अजिबात तयारीनिशी आले नव्हते, रायफलसह गुन्हेगार पकडला जातो बिबट्या नाही”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.