
गर्लफ्रेंडच्या आई-वडिलांना खुश करण्यासाठी बॉयफ्रेंडने केली सर्जरी पण शेवटी मृत्यूचं आला अंगलड... अंगावर शहारा आणणारी घटना
प्रेमात व्यक्ती कधी काय करेल याचा नेम नाही. सोशल मिडियावर प्रेमाच्या अनेक गाथा शेअर केल्या जातात. या घटना कधी लोकांना प्रेरीत करतात तर कधी काही घटना अशा असतात ज्या ऐकताच आपल्या अंगावर काटा येईल. अशीच एक घटना आता सोशल मिडियावर जोरदार ट्रेंड करत आहे आणि शेअरही केली जात आहे. घटना चिनी व्यक्तीच्या मृत्यूबाबत आहे, आपल्या गर्लफ्रेंडच्या आई-वडिलांना खुश करण्यासाठी मुलाने आपल्या शरीराची शस्त्रक्रिया करु पाहिली. या ऑपरेशननंतर त्याला स्वत:ला नव्या लूकमध्ये पाहायचे होते. पण पुढे जे घडलं ते अनर्थ ठरलं.
साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, त्या चिनी माणसाचे वजन १३० किलोपेक्षा जास्त होते आणि जो आपल्या मैत्रिणीच्या पालकांवर चांगली छाप पाडू इच्छित होता, त्याचा गॅस्ट्रिक बायपास सर्जरीनंतर मृत्यू झाला. उत्तर चीनच्या हेनान प्रांतातील शिनजियांग येथील हा तरुण रहिवासी होता. तरुणाचे नाव आहे ली झियांग, तो बऱ्याच काळापासून आपलेल्या अतिवजनामुळे संघर्ष करत होता. त्यांची उंची १७४ सेमी होती आणि त्यांचे वजन १३४ किलोपेक्षा जास्त होते. त्यांच्या मोठ्या भावाच्या मते, ली यांनी अलीकडेच डेटिंग सुरू केली होती आणि त्यांचे नाते चांगले चालले होते. त्याने आणि त्याच्या पार्टनरने एकमेकांच्या पालकांना भेटण्याचा निर्णय घेतला. पालकांच्या मनात चांगली छाप पाडण्यासाठी, ली यांनी गॅस्ट्रिक बायपास सर्जरी करण्याचा निर्णय घेतला.
ली यांना झेंगझोऊ येथील नवव्या पीपल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. २ ऑक्टोबर रोजी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली आणि दुसऱ्या दिवशी सामान्य वॉर्डमध्ये हलवण्यापूर्वी त्यांला शस्त्रक्रियेनंतर आयसीयूत हलवण्यात आले. ४ ऑक्टोबर रोजी त्यांची प्रकृती अचानक बिघडली. सकाळी ६:४० वाजता त्यांना श्वास घेण्यास त्रास झाल्याचे निदान झाले आणि त्यांना तातडीने आयसीयूमध्ये आणण्यात आले, परंतु ५ ऑक्टोबर रोजी त्यांचे निधन झाले. तथापि, या काळात कुटुंबाने अनेक प्रश्न उपस्थित केले. सोशल मिडियावर ही घटना आता चांगलीच व्हायरल होत असून त्याने इम्प्रेस करण्यासाठी फार मोठा धोका पत्कारला असे यूजर्सचे मत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.