मृत्यूच्या जबड्यातून बाहेर पडली मांजर; किंग कोब्रापासून असा केला स्वतःचा बचाव की पाहून तुम्हीही आवाक् व्हाल; Video Viral
सोशल मीडियावर प्राण्यांच्या जीवनाशी निगडित अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ कधी आपल्याला थक्क करतात तर कधी आश्चर्याचा धक्का देतात. आताही इथे असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात किंग कोब्रा आणि मांजरीतील धक्कादायक लढतीचे दृश्ये दिसून आले. मुळातच किंग कोब्रा हा एक धोकादायक प्राणी आहे तो आपल्या विषाने मोठमोठ्या प्राण्यांना मृत्यूच्या जाळ्यात अडकवू शकतो अशात त्याच्या जाळ्यातून बाहेर पडणे काही सोपी गोष्ट नाही पण सध्याच्या व्हायरल व्हिडिओत माजरने ते करून दाखवले आहे, मांजरीने कीं कोब्राला असा दणका दाखवला की तो सरळ उलटे पाय घेऊन पळू लागला. व्हिडीओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात कोब्राने मांजरीवर हल्ला केल्याचे दिसून येते. यावेळी आता मांजरीची काही खैर नाही असेच सर्वांना वाटू लागते मात्र तितक्यातच मांजर कोब्रावर असा प्रहार करते की पाहून सर्वच थक्क होतात. व्हिडिओतील दृश्ये तुम्हाला थक्क करू शकतात. मांजरीचे हे धाडस पाहून आता लोक मांजरीचे कौतुक करत आहेत, तसेच काहीजण व्हिडिओची मजा लुटत हा व्हिडिओ वेगाने शेअर करत आहेत.
काय आहे व्हिडिओत ?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात, कोब्रा मांजरीवर झेपावताच मांजर ताबडतोब मागे सरकते आणि आपला बचाव करण्यासाठी ती कोब्रावर वार करू लागते. मांजरीचा प्रहार पाहता कोब्रा घाबरतो आणि तेथून गुपचूप पळून जातो. तिचा वेग आणि सतर्कता पाहता ती कोब्रापेक्षा एक पाऊल पुढे होती असे वाटते. कोब्रा धोकादायक असू शकतो, परंतु मांजरीच्या चपळाईने त्याचा पराभव केला. हा क्षण इतका रोमांचक आहे की लोक ते पाहून थक्क होतात. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आणि तर काहींनी मांजरीचे कौतुकही केले.
Cat saves itself from cobra attack.
Fun Fact: Cat’s reaction time is approximately 20-70 milliseconds, which is faster than the average snake’s one 44-70 milliseconds. pic.twitter.com/sgTwCTMrZv
— Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) April 18, 2024
हा व्हायरल व्हिडिओ @AMAZlNGNATURE नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘मांजर स्वतःला नागाच्या हल्ल्यापासून वाचवते, मजेदार तथ्य: मांजरीचा प्रतिक्रियेचा वेळ अंदाजे 20-70 मिलिसेकंद असतो, जो सरासरी सापाच्या 44-70 मिलिसेकंदांपेक्षा वेगवान असतो” असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर आतापर्यंत अनेक युजर्सने कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ती कुल मांजर आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तो खरा हिरो आहे, त्याने कोब्राला धडा शिकवला”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.