... म्हणूनच ती गौमाता! जखमी बिबट्याला गायीने केली मदत, कधीही न पाहिलेले दृश्य, Video Viral
सोशल मीडियावर अनेक प्रकारचे निरनिराळे व्हिडिओ व्हायरल होतच असतात. तुम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असाल तर हे व्हायरल व्हिडिओज तुम्ही पहिलेच असतील. यात कधी अपघातांचे, जीवघेणे स्टंटसचे व्हिडिओज तर कधी प्राण्यांचे व्हिडिओ देखील व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ बऱ्याचदा लोकांना आपल्याकडे आकर्षित करतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एक गाय जखमी बिबट्याची मदत करताना दिसून येत आहे.
बिबटा मुळातच एक धोकादायक प्राणी आहे. जंगलातील धोकादायक प्राण्यांमध्ये त्याचा विशेष करून समावेश होत असतो, तो आपल्या थरारक शिकारीसाठी ओळखला जातो. एकदा का बिबट्याने कोणावर निशाणा साधला तर त्याच्या तावडीतुन त्या शिकाऱ्याचे जिवंत बाहेर येणे कठीण होऊन बसते. यावेळी बिबट्या शिकारासाठी नव्हे तर आपला जीव वाचवण्यासाठी गोठ्यात शिरला आणि मग गायीने जे केलं ते पाहून तुमचेही डोळे पानावतील. या सुंदर दृश्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हेदेखील वाचा – काय खरं काय खोटं? महिलेने साडीला लावली आग अन् पुढच्याच क्षणी… अंगावर काटा आणणारा Video Viral
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला एका गोठ्यातील दृश्ये दिसतील. यात एक बिबटा जखमी अवस्थेत जमिनीवर पडला आहे. यावेळी त्याच्यासमोर गाय उभी असते. बिबट्याला जखमी पाहताच ती त्याला चाटू लागते. मुख्य म्हणजे यावेळी गाईचा बछडा देखील तिथे असतो मात्र बिबटा काहीही न करत गुपचूप तिथे पडून राहतो. ही सर्व घटना कॅमेरात कैद करून आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे, जी वेगाने व्हायरल होत आहे. गायीच्या निखळ ममतेचे दर्शन या व्हिडिओतून झाले आहे.
हेदेखील वाचा – तिकिटावरून पेटला वाद! बस कंडक्टरने प्रवाशाला सीटवर लोळवत लाथा-बुक्क्यांनी हाणलं, धक्कादायक Video Viral
हा व्हायरल व्हिडिओ @abhimahale9 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला 42 मिलियनहुन अधिक लोकांनी पाहिले आहे. तसेच बऱ्याच जणांनी व्हिडिओवर कमेंट्स करत यावर आपले मत देखील मांडले आहे. एका युजरने लिहिले आहे, “बिबट्याच्या नाकातून रक्त येत आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्याच्यामुळे गाईला राज्य माता म्हणतात” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “दोडी गाव, लखन पाटील यांचा घरी आला होता.. सिन्नर”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.