लोकल ट्रेन, बस अशा काही सार्वजनिक प्रवासादरम्यान अनेकदा वाद पेटतात. बरेचदा हे वाद शाब्दिक असतात तर कधी हे वाद इतके वाढतात की व्यक्तीच्या जीवावरच बेततात. अनेकदा या वादावरून माराहाणीच्या घटना देखील घडत असतात. अशा घटनांचे व्हिडिओज सातत्याने समोर येत असतात. अनेकदा सीटवरून तर कधी शुल्लक कारणांवरून वादाचे रूपांतर मारहाणीत होत असते. सध्या अशाच एका भयंकर मारहाणीचा प्रकार सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तिकिटाच्या पैशांवरून प्रवासी आणि कंडक्टरमध्ये झालेला हा वाद नंतर इतका वाढतो की कंडक्टर थेट लाथा-बुक्क्यांनी सीटवर लोळवत प्रवाशाला तुडवतो. या घटनेवर आता युजर्स तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
काय आहे प्रकरण?
सदर घटना उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये घडली. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की, प्रवाशाला कसे कंडक्टर द्वारे लाथा-बुक्क्यांनी उडवण्यात येत आहे. माहितीनुसार, बसमध्ये तिकिटाचे पैसे मागितल्यावरून प्रवासी आणि कंडक्टर यांच्यात हा वाद सुरु झाला. शाब्दिक बाचाबाचीतून सुरु झालेला हा वाद नंतर इतका वाढला की नंतर दोघांनी एकमेकांना मारण्यास सुरुवात केली. शेवटी, इतर प्रवाशांनी मध्यस्ती करत दोघांमधील वाद मिटवला मात्र यामुळे बसला रस्त्याच्या मध्येच रोखण्यात आले.
हेदेखील वाचा – प्रेमासाठी काही पण! बायको छतावरून खाली पडताच नवऱ्याने केलं असं… धडकी भरवणारा Video Viral
मिळालेल्या माहितीनुसार, ही बस बस लखनौहून कानपूर उन्नाव आगाराकडे निघाली होती. यादरम्यान, रात्री उशिरा ही बस कृष्णनगर येथे पोहोचताच एक प्रवासी बसमध्ये येऊन बसला. यावेळी कंडक्टरने प्रवाशाकडे तिकीट विचारताच त्याने आपल्याकडे पास असल्याचे सांगितले. कंडक्टरने हा पास तपासताच हा पास 2022 सालचा असल्याचे समोर आले. त्यांनतर प्रवाशाने मी स्वत: एक बस कर्मचारी असल्याचे सांगण्यास सुरुवात केली आणि इथूनच वादाची ठींगणी पेटली. दोघांमध्ये आधी शाब्दिक वाद आणि नंतर मारामारी होऊ लागली. कंडक्टरने बेदम मारहाण करत बसमधून खाली उतरवले. यामुळे बस अर्धा तास रस्त्याच्या मधोमध थांबून राहिली. बस आणि प्रवाशांतील या वादामुळे इतर प्रवाशांना मात्र विनाकारण मनस्ताप सहन करावा लागला.
लखनऊ
लखनऊ में रोडवेज की बस में चले लात-घूसे
चलती बस में कंडक्टर ने यात्री की पिटाई की
गाली-गलौज, बहस के बाद कंडक्टर ने यात्री को पीटा
उन्नाव डिपो की बस लखनऊ से कानपुर जा रही थी
कंडक्टर ने पैसेंजर को पीटा फिर बस से नीचे उतारा।#news#up pic.twitter.com/uWzcNoFmCA— Shravan Kumar Gaud (@ShravnKumarGaud) November 10, 2024
हेदेखील वाचा – सापाने चावताच तरुणाने केलं असं… पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल, Video Viral
बस आणि कंडक्टरमधील मारामारीचा हा व्हिडिओ @ShravnKumarGaud नावाच्या एक्स अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेविषयीची माहिती देताना लिहिण्यात आले आहे की,
‘लखनौमध्ये रोडवेजच्या बसमध्ये लाथा-बुक्क्यांनी मारण्यात आलं
कंडक्टरने चालत्या बसमधील प्रवाशाला मारहाण केली
शिवीगाळ, वादानंतर कंडक्टरने प्रवाशाला मारहाण केली
उन्नाव डेपोची बस लखनौहून कानपूरला जात होती
कंडक्टरने प्रवाशाला मारहाण केली आणि नंतर बसमधून खाली उतरवले’
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.