Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Video Viral: हे वृद्ध दाम्पत्य फक्त 50 रुपयांत देतात भरपेट अनलिमिटेड जेवण, माया आणि प्रेम पाहून युजर्स झालेत घायाळ

सोशल मीडियावर एका वृद्ध जोडप्याचा गोड व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात 80 च्या दशकातील एक वृद्ध गृहस्थ आणि त्यांची पत्नी आपल्या हॉटेलमध्ये फक्त 50 रुपयांत लोकांना भरपेट अनलिमिटेड जेवण देताना दिसून येत आहे. त्यांची ही उदारता आणि प्रेम पाहून आता अनेकजण सुखावले आहेत. तसेच अनेकजण आता या जोडप्याचे कौतुक देखील करत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 13, 2024 | 03:52 PM
Video Viral: हे वृद्ध दाम्पत्य फक्त 50 रुपयांत देतात भरपेट अनलिमिटेड जेवण, माया आणि प्रेम पाहून युजर्स झालेत घायाळ

Video Viral: हे वृद्ध दाम्पत्य फक्त 50 रुपयांत देतात भरपेट अनलिमिटेड जेवण, माया आणि प्रेम पाहून युजर्स झालेत घायाळ

Follow Us
Close
Follow Us:

कर्नाटकातील उडुपी येथील एक जोडपे सध्या सोशल मीडियावर फार चर्चेत आहे. याचे कारण दुसरे काही नसून त्यांचे औदार्य आहे. खरं तर, हे जोडपं गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या हॉटेलमध्ये लोकांना पोटभर जेवण देत आहे आणि तेही फक्त 50 रुपयांमध्ये. हे दोघे मिळून एक छोटेसे हॉटेल चालवतात आणि लोकांना केळीची पानांवर घरचे पारंपरिक जेवण खायला देतात. व्हिडिओतील जोडप्याची मेहनत आणि माया पाहून आता अनेक युजर्स भावुक झाले आहेत. अनेकजण या जोडप्याचे आता कौतुकदेखील करत आहेत.

काय आहे व्हिडिओत?

80 वर्षांहून अधिक वय असलेले हे दाम्पत्य स्वतःच्या हाताने भात, भात, डाळी, दही, लोणची, कोशिंबीर आदी पदार्थ लोकांना देतात. या दोघांनाही लोक प्रेमाने अज्जा आणि अज्जी म्हणतात. व्हिडिओमध्ये तुम्ही पहिले तर दिसते की, एक वृद्ध व्यक्ती स्वतःच्या हातांनी टेबलवर केळीचे पान ठेवून जेवण वाढण्याची तयारी करत आहे. तसेच भाजीपाला, कडधान्ये वगैरे आणून एक एक करून लोकांना स्वतःच्या हाताने सर्व्ह करत आहेत.

हेदेखील वाचा – विना ड्रायव्हर जळती कार रस्त्यावर धावू लागली, लोकांचा उडाला थरकाप, Video Viral

त्याच्या हॉटेलमध्येही लोकांची मोठी गर्दी दिसते. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे जोडपे 1951 पासून त्याच पद्धतीने त्यांचे हॉटेल चालवत आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून लोकांना 50 रुपयांमध्ये अनलिमिटेड जेवण देत आहे. आजच्या महागाईच्या जगात तुम्हाला कुठेही 50 रुपयांत साधा भरपेट नाश्तादेखील मिळणार नाही आणि इथे हे जोडपे संपूर्ण जेवण देत आहेत. यावरूनच आपण त्यांच्या औदार्यतेची झलक पाहू शकतो. अनेकजण आपल्या घरापासून दूर कामासाठी दुसऱ्या शहरात जातात तेव्हा त्यांना घरचे जेवण खायला मिळत नाही आणि हॉटेलचे जेवण परवडत नाही अशा परीस्थितीत यांचे हे हॉटेल अनेकांसाठी आनंदाचे एक कारण बनू शकते.

This Elderly couple in their 80’s sell unlimited home food with unlimited love at just Rs. 50 ❤️

📍Ajja Ajji Mane, Udupi, India

©️ ig: Foody.Monk pic.twitter.com/mrWGAwp1nr

— Visit Udupi (@VisitUdupi) October 8, 2024

हेदेखील वाचा – अवघ्या 20 सेकंदात 25 लाखांचे दागिने घेऊन चोर झाले फरार, पकडणार तितक्यात…घडले असे काही, पहा Viral Video

हा व्हायरल व्हिडिओ @VisitUdupi नावाच्या एक्स अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, 80 च्या दशकातील हे वृद्ध जोडपे फक्त 50 रुपयांत अमर्यादित प्रेमाने भरपेट घरगुती अन्न विकतात असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपले मत मांडले आहे. एका युजरने लिहिले आहे, “हे शेअर केल्याबद्दल धन्यवाद. अन्न शिजवून सेवाभावाने आणि प्रेमाने दिले जाते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “किती आनंद होत आहे हा व्हिडिओ पाहून”.

Web Title: Elderly couple sell unlimited home food with just rs 50 watch video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2024 | 03:51 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.