सोशल मीडियावर दररोज निरनिराळे व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हायरल व्हिडिओज कधी आपल्याला हसवतात तर कधी आपल्याला थक्क करून जातात. मात्र सध्या एक थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येत आहे. यात चालू रस्त्यावर चक्क ज्वालांनी भरलेली जळती कार धावताना दिसत आहे. या जळत्या कारला वेगाने येताना पाहून रस्त्यावरील लोकाची तारांबळ उडाली आणि सर्वजण आपला जीव वाचवण्यासाठी तेथून आपला पळ काढू लागले. व्हिडिओतील थरारक दृश्ये पाहून थक्क झाल्याशिवाय राहणार नाही.
जयपूरमध्ये शनिवारी सोडाला भागातील एलिव्हेटेड रोडवर चालणाऱ्या एका कारला आग लागली, त्यामुळे तेथे उपस्थित असलेल्या इतर वाहनचालकांमध्ये गोंधळ उडाला. ही कार एलिव्हेटेड रोडवरून खाली येत असताना चालक जितेंद्र जांगीड यांनी गाडी थांबवली असता गाडीच्या बोनेटमधून धूर निघत असल्याचे दिसले. त्यांनी सांगितले की, आगीमुळे गाडीचा हँडब्रेक निकामी झाला, त्यामुळे आगीने वेढलेली कार एलिव्हेटेड रोडवरून खाली उतरू लागली. तेथे उपस्थित असलेले इतर वाहनचालक आणि लोक स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. कारने मोटारसायकलस्वारालाही धडक दिली.
हेदेखील वाचा – अवघ्या 20 सेकंदात 25 लाखांचे दागिने घेऊन चोर झाले फरार, पकडणार तितक्यात…घडले असे काही, पहा Viral Video
जळत्या कारचा हा व्हिडिओ तेथील एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला असून आणि सोशल मीडियावर शेअर केला. हाच व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल आहे. ज्यामध्ये जयपूरमधील अजमेर रोडवरील सुदर्शनपुरा पुलियाकडे जाणाऱ्या एलिव्हेटेड रोडवर चालकविरहित कारला आग लागल्याचे दिसून येते. जळत्या कारला आपल्याकडे आल्याचे पाहून रस्त्यावरील सर्व लोक आपला जीव वाचवण्यासाठी तेथून पळू लागले. ही थरारक घटना पाहून अनेक युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार जितेंद्र जांगीड चालवत होते. जितेंद्र एलिव्हेटेड रोडवरून खाली येत असताना कारच्या एअर कंडिशनिंग युनिटमधून धूर निघताना दिसला. घाबरून, त्याने ताबडतोब त्याच्या भावाचा सल्ला घेतला, ज्याने त्याला बोनेटच्या खाली तपासण्याचे सुचवले. गाडीतून उतरून बोनेट उचलताना जितेंद्रला इंजिनला आग लागल्याचे दिसले. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, आग विझवण्यापर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती.
जयपुर की सड़कों पर दौड़ी जलती हुई कार! pic.twitter.com/At6ZuixmSK
— Gaurav brar (@gauravbarar25) October 13, 2024
हेदेखील वाचा – रावणाला जाळायला निघालेले मात्र खुद्द रावनानेच लोकांवर सोडले अग्नीबाण, Viral Video पाहिलात का?
अग्निशमन विभागाचे अधिकारी दिनेश कुमार यांनी सांगितले की, एक टीम घटनास्थळी पाठवून आग आटोक्यात आणली, मात्र कार आणि त्यात ठेवलेले मौल्यवान सामान जळून खाक झाले. यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. घटनेचा व्हायरल व्हिडिओ @gauravbarar25 नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, जयपूरच्या रस्त्यावर धावणारी जळती कार! असे लिहिण्यात आले आहे.