युक्ती पुढे शक्ती हारली! मान पिळत, जमिनीवर लोळवत सिंहिणीने झेब्रावर चढवला हल्ला, पण तरीही हाती आले अपयश; शिकरीचा Video Viral
जंगलात शिकारीचे अनेक दृश्य नेहमीच रंगत असतात आणि याचे व्हिडिओज देखील सोशल मीडियावर व्हायरल होतात. असं म्हणतात की जंगलात फक्त मोठ्या शिकाऱ्यांच राज्य चालतं आणि इथे राहायचं असेल तर आपल्याकडे ताकद असणे फार गरजेचे आहे पण नुकताच जंगलाचा एक अनोखा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात शिकारीचे एक अनोखे आणि सर्वांना आश्चर्यचकित करणारे दृश्य दिसून आले. व्हिडिओमध्ये जंगलाचा राणी म्हणजेच सिंहिणीने एकट्या झेब्राला बघत त्याच्यावर हल्ला चढवल्याचे दिसून आले. झेब्राची मान पिळवटून ती त्याची शिकार करू पाहते पण तितक्यात झेब्रा अशी शक्कल लढवतो की सिंहिणीच्या हाती फक्त अपयश लागतं आणि झेब्रा आपला जीव वाचवण्यात यशस्वी होतो. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात दिसून येते की, एक सिंहीण झेब्रावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे. ती आपल्या जबड्यात त्याची मान दाबून त्याची शिकार करण्याचा प्रयत्न करते. पण झेब्रा हार मानत नाही आणि शेवटपर्यंत लढत राहतो. झेब्रा देखील आपली सर्व शक्ती पणाला लावतो आणि सिंहिणीला हरवतो. दोघे बराच वेळ एकमेकांत गुंतत राहतात. त्यानंतर झेब्रा योग्य वेळी हालचाल करतो आणि सिंहिणीच्या तावडीतून सुटत वाऱ्याच्या वेगाने तिथून पळून आपली सुटका करतो. सिंहिणीची पकड कमकुवत होताच आणि संधी मिळताच तो स्वतःला मोकळे करतो आणि पूर्ण वेगाने पळून जातो. सिंहीण हे पाहून क्षणभर कोड्यात पडते पण शिकार आपल्या हातातून गेला आहे हे तिला थोड्याच वेळात समजते आणि आपले अपयश ती स्वीकारते. शिकारीचा हा व्हिडिओ आपल्याला पुन्हा एकदा आठवण करून देतो की प्रत्येक वेळेला फक्त शक्तीच नाही तर युक्तीही कामी येते.
हा व्हायरल व्हिडिओ @wildfriends_africa नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ती लढाई, झेब्राची ती झेप अविश्वसनीय होती” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “भयानक!!! मला अशा गोष्टी आवडत नाहीत.. मला माहित आहे की हे निसर्गाचे काम आहे पण एखाद्या प्राण्याला त्याच्या जीवासाठी लढताना पाहणे खूप भयानक आहे.. मला आनंद आहे की झेब्रा पळून गेला… पण सिंह भुकेला गेला याचे दुःख आहे.. निसर्ग कधीकधी खूप क्रूर असतो.”
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.