(फोटो सौजन्य: Instagram)
जंगलाचे आयुष्य हे मानवाच्या आयुष्यातून बरेच वेगळे आणि साहसतेने भरलेले असते. इथे जगायचं म्हटलं की शिकार ही करावीच लागणार… जंगलात अधिकतर लहान शिकारी मोठ्या शिकाऱ्यांचे लक्ष्य बनतात ज्यामुळे लहान प्राण्यांचं खास करून पिल्लांचं जंगलात राहणं जरा कठीणच असतं. आपल्या वेगासाठी ओळखला जाणारा चित्ता क्षणातच वाऱ्याच्या वेगाने आपल्या भक्ष्याची अशी शिकार करतो की भक्ष्याला त्याच्या तावडीतून सुटाताही येत नाही. अशातच चित्ताचा आणखीन एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. पण यातील दृश्य मात्र सर्वांनाच हादरवून सोडत आहे. मोठमोठ्या प्राण्यांची शिकार करणारा चित्ता या व्हिडिओत मात्र एका लहान रानडुक्कराला घाबरून पळत असल्याचे दिसून आले.
काय दिसलं व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, एका डुक्करच्या पिल्लाने तीन चित्त्यांना असा धडा शिकवला की पाहणारे थक्क झाले. हा व्हिडिओ जंगल सफारीचा आनंद घेत असलेल्या एका पर्यटकाने रेकॉर्ड केला आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात, एका लहान डुक्कराला एकटे पाहून तीन बिबटे त्याची शिकार करण्यासाठी पुढे सरकताना दिसत आहेत. पण पुढच्याच क्षणी व्हिडिओमध्ये एक आश्चर्यकारक ट्विस्ट दिसून येतो. परिस्थिती पूर्णपणे बदलते. जीव वाचवण्याऐवजी, लहान डुक्कर बिबट्यांवर पूर्ण ताकदीने हल्ला करतो. त्यानंतर, तो त्यांचा असा पाठलाग करतो की कोणीही विचारू शकत नाही.
यादरम्यान, लहान डुक्कराचे धाडस आणि चित्त्यांचा घाबरलेला स्वभाव स्पष्टपणे दिसून येतो. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की लहान डुक्कर तीन चित्त्यांवर असा हल्ला करत धावतो की तिघेही चित्ते घाबरून त्याच्यापासून आपला जीव वाचवण्यासाठी जंगलात पळ काढतात. आपल्यात हिम्मत असेल तर मोठमोठ्या गोष्टींवरही विजय मिळवला जाऊ शकते ही शिकवण आपल्याला या व्हिडिओतून घेता येते. जंगलाचा हा व्हिडिओ @latestkruger नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत चांगलेच व्युज मिळाल्या असून अनेक युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “समूहाचा नेता! याला मोठे होताना पाहण्यासाठी मी उत्सुक आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्याच्या हिमतीला तोड नाही”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.