
मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral
आकाराने लहान दिसत असला तरी ऑक्टोपसच्या आठ बाहूंवरील शेकडो सक्शन कप्समुळे तो एखाद्या पृष्ठभागाला घट्ट पकडू शकतो. त्यामुळे ऑक्टोपस चेहऱ्यावर किंवा तोंडाजवळ चिकटल्यास त्याला दूर करणे कठीण होऊ शकते. विशेषतः तोंड आणि नाक झाकले गेल्यास श्वास घेण्यास अडथळा निर्माण होण्याचा धोका असू शकतो.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसून आलं की, मच्छीमार समुद्राच्या पाण्यात मधोमध आपली बोट लावून मासे पकडत असताना त्याच्या हाताला एक ऑक्टोपस लागतो. हा ऑक्टोपस साधासुधा नसतो तर व्यक्तीने हात लावताच तो त्याच्या चेहऱ्याभोवती आपले आठ बाहू पसरवायला सुरुवात करतो. मुख्य म्हणजे, माशाची पकड इतकी जबरदस्त असते की मच्छीमाराचे अनेक प्रयत्न यापुढे सपशेल फेल ठरतात. व्हिडिओमध्ये मच्छीनार जिवाच्या आकांताने ऑक्टोपसला आपल्या चेहऱ्यावरुन दूर करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. बऱ्याच वेळानंतरही जेव्हा ऑक्टोपस त्याच्या चेहऱ्याला सोडत नाही तेव्हा एका लाकडी राॅडचा तो वापर करतो. व्हिडिओच्या शेवटी आपल्याला मच्छीमार हळूहळू ऑक्टोपसला चेहऱ्यावरुन दूर ओढताना दिसतो ज्यात त्याला यश मिळते. ऑक्टोपसची पकड पुढे ढिली पडते आणि तो व्यक्तीच्या चेहऱ्यावरुन दूर होतो. यानंतर मच्छीमार त्याला पुन्हा पाण्यात फेकून देतो.
ही घटना सध्या सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल होत असून व्हिडिओतील दृष्यांनी यूजर्सच्या अंगावर काटा आणला आहे. सोशल मिडियावर @missmalinitrending नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या घटनेचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी या घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “जर तो ऑक्टोपसला मारण्याच्या उद्देशाने मासेमारी करत होता, तर त्याच्यासोबत जे घडलं ते योग्यच होतं”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “यात काहीच शंका नाही की हे ए.आय. (A.I.) आहे. तो माणूस इतकी धडपड करत असताना कॅमेरा इतका स्थिर का असेल?”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “मला पाहूनच भिती वाटली”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.