
हवेत को-पायलटचा हल्ला! भारतीय पायलटच्या शौर्याने वाचवले १७४ प्रवाशांचे प्राण; क्रॅश लँडिंगचा होता कट, Video समोर
विमान क्रॅश होण्यापासून रोखले आणि वाचवले प्रवाशांचे प्राण
भारतीय पायलट स्मित मछार आणि ओमानचा को-पायलट या दोघांच्याही हातात फ्लायदुबईच्या विमानाचे नियंत्रण होते. फ्लाईटने टेक-ऑफ केल्यानंतर जमिनीपासून ३३,००० फूट उंचीवर ओमानच्या को-पायलटने अचानक विमानाचे कंट्रोल पॅनेल आपल्या हातात घेतले आणि विमानाला क्रॅश करण्याचा प्रयत्न तो करु लागला. भारतीय पायलटने त्याच्या या कटात अडथळा आणू नये यासाठी त्याने स्मित मछारवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात स्मित गंभीर जखमी झाला आणि त्याच्या शरीरातून रक्तस्त्राव होऊ लागला.
वेगाने खाली जात होते विमान
फ्लायदुबई विमान वेगाने ३३,००० फूट उंचीवरुन अवघ्या ३० सेकंदात १७,००० फूट उंचीवर पोहचले होते. स्मित मछार घायाळ होते. पण धुरंधर चित्रपटाचा तो फेमस डायलाॅग तर तुम्हाला माहितीच असेल की ‘घायाळ आहे म्हणून जास्त घातक आहे’. या घटनेत हा डायलाॅग सत्यात उतरताना दिसला. घायाळ असतानाही धैर्य दाखवत त्यांनी प्लेनचे कंट्रोल पॅनेल ओमानच्या पायलटकढून आपल्या हातात घेतले आणि काॅकपिटच्या आत प्लेन क्रॅश न होण्यासाठी प्रयत्न करु लागले. विचार करा, घायाळ अवस्थेत को-पायलटला सामोरं जात, विमानाची कमान आपल्या हातात घेणे आणि या भीषण परिस्थितीतून प्लेनची सेफ लँडिंग करणे काही सोपी गोष्ट नाही.
स्क्वॉक कोडमुळे हायजॅकची बातमी पसरली
या घटनेची माहिती एअर ट्रफिक कंट्रोलपर्यंत पोहचवण्यासाठी स्मित मछाल यांनी सर्वात आधी ७७०० हा कोड पाठवला. हा कोड अपातकालिन परिस्थितीत पाठवला जातो. विमान गंभीर समस्येत सापडले आहे आणि त्याला मदतीची आवश्यकता आहे, हे ग्राउंड कंट्रोलला कळवण्यासाठी पायलट ट्रान्सपॉन्डरमध्ये स्क्वॉक ७७०० कोड पाठवतो. याच्यामुळे एटीसीला समजते की विमान संकटात आहे. या कोडमुळे दुबईच्या तेल अवीववरुन निघालेला विमान हाय-जॅक झाला आहे याची माहिती सुरवातीलाच मिळाली. तथापि, विमानाचे सुरक्षित लँडिंग आणि प्रवाशांमधील संभाषणानंतर विमानातील रक्तरंजित थरारावरुन पडदा हटला.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी घटनेवर प्रतिक्रिया देत म्हटले की, “मी एका इस्रायली प्रवाशाशी बोललो. त्याने मला सांगितले की विमान गरगर फिरू लागले आणि खाली कोसळू लागले.” प्रवाशाने नेत्याहू यांना सांगितले की, त्यांनी कसेबसे एका क्रु मेंबरच्या मदतीने काॅकपीटचा दरवाजा उघडला आणि सर्वांनी मिळून ओमानच्या पायलटवर हल्ला चढवला.
Kindly watch the AI DEPICTION of #SMITMACHCHAR Saving the 174 lives eventhough he got stabbed by his Extremist terrorist Omani Co-pilot His bravery remembered forever by Israel We are proud of him 🇮🇳🕉️🙏 pic.twitter.com/bFr0uTguQY — Nikipedia🕉️ (@Nikhilkaranam15) October 1, 2026
एआय व्हिडिओ व्हायरल
दरम्यान या संपूर्ण घटनेचा एक तपशीलवार एआय व्हिडिओ अलिकडे सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला घटना कशी घडली, हल्ला कसा केला गेला आणि या परिस्थितीतून भारतीय पायलटने विमानाची सेफ लँडिंग कशी केली याची सर्व माहिती व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्यात आली आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर ट्रेंडिंग होत असून पायलटच्या धाडसाचे आता जगभरात काैतुक केले जात आहे.