
बापरे! व्हिडिओ गेमच्या नादात व्यक्तीने स्वतःला तब्बल 2 वर्ष खोलीत कोंडलं, दरवाजा उघडताच दिसले किळसवाणे दृश्य; Video Viral
काय आहे प्रकरण?
हाॅटेलमध्ये राहताना काही नियमांचे पालन होणे फार महत्त्वाचे असते. उदाहरणार्थ, चेक आउट करण्यापूर्वी, खोली स्वच्छ आहे याची खात्री करणे, उपकरणे बंद करणे, टॉवेल व्यवस्थित दुमडणे, बेड तयार करणे आणि कचरा योग्यरित्या विल्हेवाट लावणे ही तुमची जबाबदारी आहे. परंतु चीनमधील एका व्यक्तीने शिष्टाचारांचे फक्त उल्लंघनच केले नाही तर आपल्या घाणेरड्या आणि आळशी वृत्तीचा उच्चांग गाठला. सोशल मिडियावर ही घटना सध्या फार चर्चेत असून घटनेतील दृश्यांनी सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. द सनच्या वृत्तानुसार, हा व्यक्ती एक उत्साही ऑनलाइन गेमर होता ज्याने या चांगचुन हॉटेलमध्ये दोन वर्षांचा मुक्काम बुक केला होता. हॉटेल कर्मचाऱ्यांच्या मते, तो क्वचितच त्याच्या खोलीतून बाहेर पडत असे. तथापि, दोन वर्षांनंतर जेव्हा त्याने चेक इन केले तेव्हा खोली अत्यंत वाईट स्थितीत होती, ज्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
रिपोर्टनुसार, गेमच्या मागे वेडा झालेला हा व्यक्ती तब्बल दोन वर्षे एका खोलित बंद होता, तो कधीही बाहेर पडला नाही. एका ॲपद्वारे तो जेवण मागवायचे. जेव्हा तो शेवटी बाहेर आला तेव्हा सफाई कामगारांना खोली कचऱ्याच्या एक मीटर उंच ढिगाऱ्याने झाकलेली आढळली, त्याचे डेस्क आणि खुर्ची ढिगाऱ्यात पुरलेली होती. व्हिडिओमध्ये असंख्य घाणेरडे आणि चुरगळलेले रॅपर, रिकाम्या बाटल्या आणि कॅन तसेच खोलीच्या जवळजवळ प्रत्येक कोपऱ्यात अडकलेले अन्नाचे बॉक्स दिसत होते. जमिनीवर असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याखालून दोन गेमिंग खुर्च्या आणि एक टेबल बाहेर डोकावत होते. बाथरूमची अवस्थाही तितकीच वाईट होती, शेकडो ओले टॉयलेट पेपर आणि टाकून दिलेल्या वस्तू जमिनीवर पसरलेल्या होत्या, अगदी शौचालय आणि वॉशबेसिनही कचऱ्याने झाकलेले होते.
Man checks out from a hotel in China after two years This is how the hotel room was found…pic.twitter.com/BwZHjx5Jtg — Defiant L’s (@DefiantLs) December 18, 2025
द सन वृत्तपत्रानुसार, खोली पूर्णपणे स्वच्छ आणि निर्जंतुक करण्यासाठी तीन दिवस लागले. तरीही, हॉटेल व्यवस्थापनाने सांगितले की खोलीला अजूनही नुकसान झाले आहे, पाहुण्यांसाठी ती पुन्हा उघडण्यापूर्वी व्यापक दुरुस्तीची आवश्यकता आहे. हॉटेलमध्ये ई-स्पोर्ट्स खेळाडूंसाठी राहण्याची व्यवस्था आहे, ज्यामध्ये संगणक गेमिंग उपकरणे, हाय-स्पीड इंटरनेट आणि विशेष गेमिंग खुर्च्यांचा समावेश आहे.