(फोटो सौजन्य – X)
काय घडलं व्हिडिओत?
व्हिडिओची सुरुवात एका सामान्य दृश्याने होते. एक महिला तिच्या घराबाहेर उभी असलेली दिसते. आकाश ढगाळ आहे, पण सुरुवातीला कोणताही धोका दिसत नाही. हलका वारा वाहत आहे आणि हवामान थोडे उथळ वाटते. असे दिसते की पाऊस पडणार आहे. पण काही सेकंदातच परिस्थिती वेगाने बदलते आणि शांत वातावरण अचानक भयावह बनते. जसजसा वेळ जातो तसतसा वाऱ्याचा वेग वाढतो. काळे ढग दाट होतात आणि वातावरणात एक विचित्र शांतता पसरते. अचानक, जोरदार वाऱ्यांसह एक वादळ निर्माण होते. चिखल, धूळ आणि लहान कचऱ्याचे ढग हवेत फिरतात आणि आकाशाकडे वर येतात. हे दृष्य इतक्या वेगात बदलते की महिलेला नक्की काय घडत आहे याचा अंदाज लावता येत नाही आणि तितक्यातच परिस्थिती हाताबाहेर जाते. चक्रिवादळ महिलेच्या घराजवळून जात असतानाच ती या वादळात ओढली जाते आणि काही क्षणातच ती हवेच्या या वादळात गायब होते. हे दृष्य इतके भयानक असते की पाहणाऱ्यांच्या अंगावरही काटा येतो.
बहुत तेज़ हवा है 1 कुंटल की औरत भी उड़ गई हवा के साथ pic.twitter.com/qPeUy7VRUF — Muhammad Haroon (@Razvi_Sher7) December 20, 2025
दरम्यान हे दृष्य नक्की कुठले आहे याची अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. व्हिडिओतील दृष्ये खरी आहेत की खोटी यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. काहींनी दृष्यांवर आश्चर्य व्यक्त केले आहे तर काहींनी हे दृष्य एआय निर्मित असल्याचे म्हटले आहे. एका युजरने लिहिले आहे, “सध्या हे नैसर्गिक नाहीये, ते नक्कीच एआय आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखे दिसते आणि निसर्गाचे हे रूप देखील खूप भयानक आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “निसर्गाचे खरे रूप केवळ सुंदरच नाही तर धोकादायक देखील आहे आणि ते आपल्याला नम्र राहण्यास शिकवते”. हा व्हिडिओ @roshnipar0786 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






