Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 9 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक-दोन नाही तर बाईकवर बसवले चक्क ५०० हॉर्न! पोलिसांनी अ‍ॅक्शन मोड पाहून यूजर्स अवाक्, Video Viral

OMG Video : हरिद्वारमधील कांवड यात्रेदरम्यान ५०० हॉर्न लावलेली एक अनोखी बाईक चर्चेत आली आहे. रस्त्यावर या बाईकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि पोलिसांनीही तत्काळ बाईकला जप्त केले.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 09, 2026 | 10:16 AM
एक-दोन नाही तर बाईकवर बसवले चक्क ५०० हॉर्न! पोलिसांनी अ‍ॅक्शन मोड पाहून यूजर्स अवाक्, Video Viral

एक-दोन नाही तर बाईकवर बसवले चक्क ५०० हॉर्न! पोलिसांनी अ‍ॅक्शन मोड पाहून यूजर्स अवाक्, Video Viral

Follow Us
Follow Us:
  • कांवड यात्रेदरम्यान रस्त्यावर एक अनोखी मॉडिफाइड बाईक दिसली.
  • बाईक पाहण्यासाठी रस्त्यावर नागरिकांची गर्दी जमली.
  • या अनोख्या बाईकचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.
हरिद्वारमध्ये सुरु असलेल्या कांवड यात्रेदरम्यान वेगवेगळे रंग पाहायला मिळाले. उत्तराखंड आणि शेजारील राज्यांमधून लाखो भाविक गंगेचे पाणी मिळवण्यासाठी हरिद्वार येथे दाखल झाले. कांवड यात्रेत श्रद्धालु दुसऱ्यांचे लक्ष आपल्याकडे खेचून घेण्यासाठी निरनिराळे प्रकार करु पाहत होते. यादरम्यानच ५०० हार्न लावलेल्या एका बाईकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या बाईकचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून मुख्य म्हणजे ही बाईक एक पोलिस अधिकारी चालवत असल्याचे आढळून आले आहे.

अगं बाईई… आता गायही करणार वर्कआउट? जिममधील ती सरप्राईज एंट्री पाहून सर्वांना बसला धक्का; Video Viral

मिळालेल्या माहितीनुसार, ही बाईक फरिदाबादमधील अमन या व्यक्तीची असल्याचे सांगितले जात आहे. बाईकला सामान्यरित्या माॅडिफाय करण्याऐवजी साधारण ५०० हार्न्स लावून याला अनोख्या रितीने सजवण्यात आले होते. इतक्या प्रचंड प्रमाणात हाॅर्न लावलेली ही बाईक सर्वांच्याच डोळ्यात आली आणि रस्त्यावर लगेचच बाईकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. इतक्या मोठ्या प्रमाणात बाईकवर हाॅर्न लावल्याचे पाहून सर्वच थक्क झाले. रस्त्यावर धावणारी ही अनोखी बाईक पाहून पोलिसही हादरले आणि त्यांनी हरिद्वारच्या शंकराचार्य परिसरात तिला थांबवले.

चुकीच्या पद्धतीने बाईकला माॅडिफाय केल्याने तपासात पोलिसांनी बाईकला जप्त केले. कारवाईनंतर जेव्हा पोलिस बाईकला कंखाल पोलिस ठाण्यात घेऊन जात होते तेव्हा मागून एका व्यक्तीने या बाईकचा व्हिडिओ शूट केला. व्हिडिओ व्हायरल होताच ५०० हार्नवाली ही बाईक इंटरनेटवर चर्चेत आली आणि लोकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली.

Haridwar Police Cracks Down on Modified Bikes During Kanwar Yatra Haridwar Police is taking strict action against Kanwariyas reaching the city on modified motorcycles to collect Gangajal. Such bikes are being directly seized by police as part of a crackdown on unruly behaviour… pic.twitter.com/PLRnoij0vm — Atulkrishan (@iAtulKrishan1) August 7, 2026

पाय मोडला म्हणून उपचारासाठी चक्क पुठ्ठ्याचा आधार! डॉक्टरांचा कारनामा पाहून यूजर्स संतापले; Video Viral

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. कारवाईनंतर बाईकला कंखाल पोलिस ठाण्यात नेण्यात आले. यादरम्यान बाईकवर लावण्यात आलेले हाॅर्न्स रस्ताभर चर्चेचा विषय बनले. हरिद्वार कावंड यात्रेत बऱ्याचदा अशा अतरंगी गाड्या आणि काही अनोखे प्रकार लोकांचे लक्ष वेधून घेत असतात. सध्या बाईक पोलिसांच्या ताब्यात असून यावर लावण्यात आलेल्या हाॅर्न्सही संख्या पाहून धक्कादायक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. एका यूजरने म्हटले की, “ज्याची गाडी आहे त्याला समोर बसवून दिवसभर हॉर्न वाजवत राहा.. बहिरा होईल तेव्हा त्याला समजेल”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अधिकाऱ्याने हेल्मेट का घातलं नाही”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “बापरे ही कुणाची गाडी आहे?”. ही घटना कांवड यात्रेतील एक चर्चेचा विषय बनली आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Haridwar kanwar yatra viral bike unique modification video goes viral social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 10:16 AM

Topics:  

  • trending
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

अगं बाईई… आता गायही करणार वर्कआउट? जिममधील ती सरप्राईज एंट्री पाहून सर्वांना बसला धक्का; Video Viral
1

अगं बाईई… आता गायही करणार वर्कआउट? जिममधील ती सरप्राईज एंट्री पाहून सर्वांना बसला धक्का; Video Viral

पाय मोडला म्हणून उपचारासाठी चक्क पुठ्ठ्याचा आधार! डॉक्टरांचा कारनामा पाहून यूजर्स संतापले; Video Viral
2

पाय मोडला म्हणून उपचारासाठी चक्क पुठ्ठ्याचा आधार! डॉक्टरांचा कारनामा पाहून यूजर्स संतापले; Video Viral

यमराज घ्यायला आलेच होते तितक्यात… मृत्यूपासून एक इंच दूर होता तरुण, साडीचा आधाराने वाचला जीव; थरारक Video Viral
3

यमराज घ्यायला आलेच होते तितक्यात… मृत्यूपासून एक इंच दूर होता तरुण, साडीचा आधाराने वाचला जीव; थरारक Video Viral

७७ वर्षांची प्रतीक्षा संपली! गावात पहिल्यांदाच पोहोचली सरकारी बस, गावकऱ्यांचा आनंद गगनात मावेना; Video Viral
4

७७ वर्षांची प्रतीक्षा संपली! गावात पहिल्यांदाच पोहोचली सरकारी बस, गावकऱ्यांचा आनंद गगनात मावेना; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.