तिच्यासाठी काय पण! भररस्त्यात तरुणाने धरले कान; प्रेमात कसला आलाय Ego... जोडप्याचा Video Viral
प्रेमात लोक आंधळी होतात, वाटेल ते करायला तयार असतात… अशा अनेक गोष्टी तुम्ही आजवर ऐकल्या असतील. आपल्या आवडीच्या व्यक्तीला खुश करण्यासाठी लोक वाटेल ते करू शकतात. जिथे प्रेम आहे तिथे रुसवे-फुगवे, भांडणं तर होणारंच पण जगाला दुर्लक्ष करून जेव्हा आपण आपल्या जोडीदाराची निवड करतो तेव्हा ते प्रेम लक्षणीय ठरते. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे ज्यात एका जोडप्याचे सुंदर क्षण कॅमेरात कैद झाले. आपल्या रुसलेल्या बायकोला मनवण्यासाठी तो भररस्त्यात आपले कान पकडून तिची माफी मागताना दिसून आला. चला व्हिडिओत काय काय दिसलं ते सविस्तर जाणून घेऊया.
खारुताई आणि सापाची फाईट कधी पाहिली आहे का? एकमेकांविरुद्ध भिडले अन् मग जे घडलं… मजेदार Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो यात रस्त्यात एक मुलगी चालत जाताना दिसून येते आणि याचवेळी एक मुलगा गाडीवर बसून तिला मनवण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या बायकोचा रुसवा घालवण्यासाठी तो गाडी तिच्यासमोर तिला अडवतो आणि तिने रागवायच्या आतच आपले कान पकडून तो तिची माफी मागू लागतो. त्याचा हा अंदाज पाहून बायकोही क्षणात खुश होते आणि तिच्या गालावरील स्मितहास्य आपल्याला व्हिडिओत स्पष्ट दिसून येते. हे सर्व दृश्य लांबूनच एक व्यक्ती आपल्या कॅमेरात कैद करतो. हा व्हिडिओ आपल्याला नवरा-बायकोच्या नात्यातील सुंदर आणि निखळ प्रेम दाखवून देतो. जिथे प्रेम असते तिथे माणूस थोडा झुकतोच आणि यातूनच साध्य होतो तो म्हणजे नात्याचा गोडवा.
हा व्हायरल व्हिडिओ @sarcastic.wholesome नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘पुरुषी अहंकार इथे संपतो’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया स्त्रीच्या चेहऱ्यावरील प्रत्येक क्षणाच्या तेजामागे एक पुरूष असतो जो माफी मागतो” ” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे फक्त आपल्या आवडीच्या व्यक्तीसोबतच घडू शकते”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.