
अरे बापरे! तरुणाच्या जुगाडाने सर्वच हादरले, हेल्मेट भेटला नाही म्हणून चक्क टीव्ही लावली डोक्यावर... Video Viral
भारतीय आणि त्यांचे देसी जुगाड नेहमीच सोशल मिडियावर ट्रेंड करत असतात. हे जुगाड आपल्या कल्पनेपलिकडचे असतात आणि म्हणूनच पाहता क्षणीच ते आपल्याला थक्क करुन सोडतात. नुकताच सोशल मिडियावर असाच एक जबरदस्त आणि आश्चर्यचकीत करणारा एक नवीन व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यातील दृश्यांनी सर्वच हादरुन गेले असून यात व्यक्तीने अशी गोष्ट करुन दाखवली आहे ज्याचा आपण कधी स्वप्नातही विचार केला नसेल. या व्हिडिओने सोशल मिडियावर सर्वांचेच लक्ष वेधले असून लोक वेगाने त्याला शेअर करत आहेत. चला व्हिडिओत काय घडलं ते जाणून घेऊया.
काय दिसलं व्हिडिओ?
सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात एक बाईकस्वार आपल्या बाईकवर बसलेला दिसत आहे. यावेळी त्याने त्याच्या हातात एक टीव्ही पकडली असून तो फार निरखून या बाईकला पाहत असतो. आपल्याला काही कळेल याआधीच तरुण ही टीव्ही एका हेल्मेटप्रमाणे आपल्या डोक्यावर सजवतो आणि आपली बाईक घेऊन तिथून निघून जातो. त्याचा हा अनोखा जुगाड पाहून लोक आता यावर आश्चर्य व्यक्त करत आहेत. तरुणाला हेल्मेट मिळालं नसाव, म्हणून त्याने टीव्हीलाच आपले हेल्मेट बनवले अशा मिश्किल प्रतिक्रियाही व्हिडिओला मिळत आहेत. तर तरुणाने हे नक्की केले कसे असा प्रश्नही काहींच्या मनात संभ्रम निर्माण करत आहे. दरम्यान तरुणाचा हा प्रकार हटके असला तरी खऱ्या आयुष्यात असं करणं अनेक दुर्घटनांना आमंत्रण देऊ शकतं, यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता वर्तवली जाऊ शकते.
अगर आपके पास हेलमेट नहीं है, तो आप पुरानी खराब टीवी से भी काम चला सकते हैं। 😂 pic.twitter.com/GtsLZ6Luah — Pranjal (@Pra7oel) October 25, 2025
हा व्हायरल व्हिडिओ @Pra7oel नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘जर तुमच्याकडे हेल्मेट नसेल, तर तुम्ही जुन्या तुटलेल्या टीव्हीनेही काम चालवू शकता’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “पण अपघातावेळी हा हेल्मेट जीव वाचवण्याऐवजी जीव घेण्याचे काम करेल” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे खूप रस्की असू शकते, कृपया अस करु नका” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “व्वा, काय जुगाड घेऊन आलाय”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.