(फोटो सौजन्य: X) (
सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म आहे, जिथे अनेक गोष्टी शेअर केल्या जातात. कधी हसवणारे तर कधी थक्क करणारे व्हिडिओज इथे शेअर केले जातात. यासहच बऱ्याचदा अनेक धक्कादायक घटनांचा खुलासाही इथे होतो. अशातच मागील काही काळापासून एक व्हिडिओ इथे खूप जास्त शेअर केला जात आहे. व्हिडिओमध्ये उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील संगम शहरातील एक तरुण सौदी अरेबियामध्ये कठीण परिस्थितीत अडकल्याचे सांगण्यात येत आहे. तरुणाने या व्हिडिओमध्ये रडत परदेशातून पुन्हा आपल्या मायभूमीत परतण्याची मागणी केली.
काय आहे प्रकरण?
तरुणाचे नाव इंद्रजित असून तो मूळचा हंडिया तहसीलच्या सराई ममारेझ पोलीस स्टेशन परिसरातील शेखपूर छतौना गावचा रहिवासी आहे. इंद्रजितचा आरोप आहे की सौदी अरेबियामध्ये तो वाईटरित्या अडकला असून त्याच्या प्रायोजकाने त्याचा पासपोर्ट जप्त केला आहे. तो म्हणतो की तो पूर्णपणे एकटा आहे, त्याच्या आजूबाजूला फक्त वाळवंटआहे. तो म्हणतो की त्याला वचन दिलेल्या नोकरीऐवजी वाळवंटात उंट पाळण्याचे काम देण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये रडताना या सर्व गोष्टींचा खुलासा करत पुन्हा भारतात परतण्याची मागणी केली. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर केला जावा असेही त्याने म्हटले.
इंद्रजितची आई रंजू देवी म्हणाली की, तिचा मुलगा पहिल्यांदाच परदेशात गेला आहे आणि तिथलं वातावरण त्याच्यासाठी नवीन आहे, त्यामुळे तो घाबरला आहे. तिने विश्वास व्यक्त केला की तिचा मुलगा त्याचा दोन वर्षांचा व्हिसा पूर्ण करेल आणि सुरक्षित परत येईल. त्याची पत्नी पिंकी म्हणाली की ते दररोज बोलतात. कधीकधी तो रागाच्या भरात काहीतरी अनुचित बोलतो, परंतु ती त्याला असे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करू नये म्हणून पटवून देण्याचा प्रयत्न करेल.
माननीय विदेश मंत्री @DrSJaishankar जी तत्काल संज्ञान मे ले, प्रयागराज हंडिया प्रतापपुर का रहने वाला फंसा सऊदी अरब मे… पार्ट 1 सभी भाई बहन इस वीडियो को शेयर करें ताकि इसकी सहायता हो पाए 🙏 pic.twitter.com/5op97otITq — कल्पना श्रीवास्तव 🇮🇳 (@Lawyer_Kalpana) October 23, 2025
हा व्हायरल व्हिडिओ @Lawyer_Kalpana नावाच्या इंस्टाग्राम एक्स शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘माननीय परराष्ट्र मंत्री @DrSJaishankar कृपया या प्रकरणाची त्वरित दखल घ्या. प्रयागराजमधील हंडिया प्रतापपूर येथील एक रहिवासी सौदी अरेबियात अडकला आहे.सर्व बंधू आणि भगिनींनो, कृपया हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्याला मदत मिळू शकेल’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हा व्हिडिओ खरा आहे खोटा” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तो त्याच्या गावाचा पत्ता सांगतो पण नाव सांगत नाही, काहीतरी संशयास्पद वाटते” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “कृपया करून त्याची मदत करावी”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






