चमत्कारच म्हणावा! 16 हजार किलोची बस तरुणाच्या अंगावर चढली तरीही त्याला साधं खरचटलंही नाही, थरारक Video Viral
कधी कोणाच्या आयुष्यात काय होईल ते सांगता येत नाहीत. अपघातांचे अनेक व्हिडिओ येत्या काळात सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत मात्र याबाबतीत काही लोक फार नशिबवान असतात. जिथे एक शुल्लक घटना लोकांचा जीव घेते तिथेच काही लोक अशी आहेत जे मोठमोठ्या घटनांतून आपला जीव वाचवून बाहेर पडतात. याचिच प्रचिती देणारा एक थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यातील दृश्ये कोणत्या चमत्काराहून कमी नाही. चला व्हिडिओत नक्की काय आहे ते जाणून घेऊयात.
सोशल मीडियावर नेहमीच अनेक वेगवगेळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ आपल्याला कशी हसवतात, कधी भावुक करतात तर कधी आश्चर्याचा धक्का देऊन जातात. सध्या असाच डोकं चक्रावून टाकणारा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एका तरुणासोबत झालेल्या भीषण अपघाताचे दृश्य दिसून येत आहे. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे यात त्याला काहीच होत नाही आणि तो सुखरूप यातून बाहेर पडतो. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर युजर्सना अचंबित करत आहे.
अरे जनाची नाही तर मनाची तरी! वृद्ध व्यक्तीने मादी श्वानाला नेलं शौचालयात अन्… विकृत कृत्याचा Video Viral
नक्की काय घडले?
सदर घटना ही केरळमधील कट्टपना या ठिकाणी घडली आहे. झालं असं की, कुमिली गावांत राहणारा विष्णू कट्टपना बस स्टँडवर बसून आपला स्मार्टफोन युज करत होता तेवढ्यात त्याचे लक्ष नसताना अचानक समोरून एक भलंमोठी बस त्याच्या अंगावर चढते. लक्षवेधी बाब म्हणजे ही बस पार्किंगमध्ये न थांबता थेट सँडमध्ये बसलेल्या विष्णूच्या अंगावर येते. यानंतर आजूबाजूची लोक त्याच्या मदतीसाठी धाव घेतात असेच बसचालकही त्वरित आपली बस मागे घेतो. सुदैवाने तरुणाचे शरीर बसच्या चाकांखाली जात नाही ज्यामुळे त्याला काहीच होत नाही. या बसचे वजन साधारण 10-16 किलो असल्याचे सांगितले जात आहे.
हा व्हायरल व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. घडलेली घटना ही साधी नाही, बसचालकाने वेळीच बस थांबली नाहीतर त्या तरुणांसह आणखीन काही लोकांनाच जीव धोक्यात जाऊ शकत होता. बस प्रशासनानं जेव्हा या घटनेची चौकशी केली तेव्हा समोर आलेल्या माहितीनुसार बसचे ब्रेक फेल झाल्याचे उघड झाले. चालक बराच वेळ ब्रेक दाबत होता पण बस काही थांबायचं नाव घेत नव्हती. अखेर त्यानं आपली अक्कलहुशारी वापरून बस रोखली.
Man Survives After bus Runs over him at Kattappana Bus Stand, Keralapic.twitter.com/xaqSHVhiug
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) December 3, 2024
हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून अनेक लोक व्हिडिओवर कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. एका युजरने लिहिले आहे, “कोणतीही गंभीर हानी होण्यापूर्वीच चालकाने बस पलटी केली. मात्र, त्या व्यक्तीला गुडघ्याला दुखापत झाली होती…” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “”चमत्काराबद्दल बोला! तुमच्यावर धावत असलेल्या बसमधून वाचणे ही काही विलक्षण गोष्ट नाही. जीवनाने त्याला आणखी एक संधी दिली – प्रत्येकजण सुरक्षित रहा!”
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.