
विषारी विंचूची माशाने केली शिकार, आधी शेपटी खाल्ली अन् फिशपॉटमध्येच सुरु झालं घमासान युद्ध... Video Viral
या जगात विविध प्रकारचे प्राणी-पक्षी वास्तव करत आहेत. यातील बहुतेकजण मांसाहारी आहेत, आपलं पोट भरण्यासाठी शिकार त्यांच्यासाठी फार महत्त्वाची भूमिका बजावते. अशातच नुकताच सोशल मिडियावर एका अनोख्या शिकारीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात चक्क शिकाऱ्याचीच एका माशाने शिकार केल्याचे दिसून आले. व्हिडिओमध्ये विषारी विंचू फिश पाॅटमध्ये असल्याचे दिसते जिथे त्याला पाहून एक लहान मासा त्याच्यावर हल्ला करतो. आपल्यावर झालेला हा हल्ला पाहून विंचूही काही गप्प बसत नाही आणि तो माशाच्या अंगावर धावून जातो. जीवन-मरणाच्या या युद्धात आता नक्की कुणाचा विजय झाला ते चला व्हिडिओतून सविस्तर जाणून घेऊया.
रस्त्यावर झुंफली मुलींची WWE फाईट, धक्का देताच तरुणी गेली जमिनीखाली… भयंकर हाणामारीचा Video Viral
काय दिसलं व्हिडिओत?
सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात विंचू पाण्यात आजूबाजूची दृश्ये पाहण्यास मग्न असतो. याचवेळी मागून एक पिवळ्या रंगाचा मासा त्याच्यावर हल्ला करतो आणि एका सेकंदातच त्याची शेवटी गिळंकृत करतो. मागून झालेल्या या हल्ल्याने विंचू घाबरतो आणि आपला जीव वाचवण्यासाठी माशावर हल्ला चढवतो. विंचू एक विषारी प्राणी आहे पण पाण्यात मात्र त्याचं फारसं काही चालत नाही. विंचू स्वतःला वाचवण्यासाठी माशापासून दूर पळतो पण शेवटी माशा त्याला पकडतो आणि इथेच व्हिडिओचा शेवट होतो. व्हिडिओत नक्की कुणी कुणाला खाल्लं हे तर स्पष्ट झालं नाही पण दृश्ये पाहून माशानेच विंचूला पकडल्यानंतर त्याला खाऊन टाकल्याची शक्यता वर्तवली जाऊ शकते. इवल्याशा माशाने विषारी प्राण्याची केलेली ही शिकार आता अनेकांना अचंबित करत आहे.
pic.twitter.com/ijzq6onlmU — Wildlife Uncensored (@TheeDarkCircle) October 31, 2025
या अनोख्या शिकारीच्या व्हिडिओ @TheeDarkCircle नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 41 हजाराहून अधिकच्या व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “पण विंचू पाण्यात आला कसा?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बापरे, मासेही धोकादायक ठरु शकतात” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हा कोणत्या प्रकारचा मासा आहे?”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.