(फोटो सौजन्य: X)
सोशल मिडिया एक अशी दुनिया आहे, जिथे रोज काही ना काही नवीन घडून येत असतं. इथे असे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात, ज्यातील दृश्ये आपल्याला थक्क करुन सोडतील. इथे विचित्र स्टंट, अनोखे जुगाड आणि धक्कादायक अपघाताचे दृश्य शेअर केले जाते. पण नुकताच इंटरनेटवर एक मजेदार व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यातील दृश्यांनी सर्वांनाच हादरवून सोडलं. वातावरणातील बदलांमुळे घरात येणाऱ्या मच्छरांचे प्रमाण सातत्याने वाढतच चालले आहे. आपल्या रक्ताच्या शोधात असणारे हे मच्छर चावून चावून आपल्याला हैराण करुन सोडतात. अशातच एका महिलेने या मच्छरांच्या संपूर्ण समाजालाच मारुन टाकल्याचा एक मजेदार व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये मेलेल्या मच्छरांचा एक मोठा संच आपल्याला दिसून येतो. महिलेने इतक्या मच्छारांना एकत्रित नक्की मारलं कसं हा प्रश्न आता यूजर्सला गोंधळात टाकत आहे. चला व्हिडिओतील या घटनेविषयी सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एका पेपरावर जवळपास शेकडो मच्छर मरुन पडल्याचे दिसून येत आहे. त्यांना दाखवत ती मुलगी म्हणते, “हे सर्व डास उडत होते. मग मी एक अगरबत्ती पेटवली आणि ते सर्व पडू लागले. त्यानंतर, मी ते सर्व गोळा केले. छान नाही का? सध्या ते मेलेले नाहीत, ते बेशुद्ध आहेत, पण आपण त्यांना या स्थितीत सोडू शकत नाही, म्हणून आपण त्यांचे अंतिम संस्कार केले पाहिजेत.” यानंतर, ती त्या सर्वांना आगीत फेकून त्यांचा शेवट करते. मच्छर मारण्यासाठी अनेकजण वेगवेगळे उपाय करतात पण एकावेळी इतक्या मच्छरांचा नायनाट सहसा कोणत्याही उपायाने होत नाही, हेच कारण आहे की, मुलीचा हा पराक्रम आता सर्वांना थक्क करुन सोडत आहे. मच्छरांना मारायला मुलीने नक्की कोणती अगरबत्ती वापरली असा प्रश्नही आता यूजर्स करत आहेत.
Demon slayer ❌
Mosquito slayer ✅✅ pic.twitter.com/lq8qR4snMZ — સરપંચ શ્રી બંકો 💀 (@gujjuallrounder) October 30, 2025
हा व्हायरल व्हिडिओ @gujjuallrounder नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “बापरे, इतक्यांना एकत्र कसं काय मारलं” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मच्छरांचा अंतिम संस्कार पण करुन टाकला ” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ती महिला आहे ती काहीही करु शकते”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






