man catch lizard with mouth shocking video goes viral
सोशल मीडियावर रोज काही ना काही विचित्र गोष्टी पाहायला मिळत आहे. अलीकडे सोशल मीडियावरील प्रसिद्धीसाठी, लाईक्स आणि व्ह्यूज साठी लोक धोकादायक असे स्टंट करताना दिसत आहे. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील धक्का बसेल. हा व्हिडिओ वाळवंटातील असल्याचे दृश्यांवरुन लक्षात येते. यामध्ये एक तरुण सरड्याला बिळातून बाहेर काढण्यासाठी असा काही स्टंट करतो पाहून अनेकजण चक्रावले आहे. सध्या या व्हिडिओवर विश्वास ठेवणेही कठीण वाटत आहे. पण यामुळे तरुणाचा जीवही गेला असता.
या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण वाळंवटाच्या मध्यभागी दिसत आहे.तो एका बिळातून सरड्याला बाहेर काढत आहे. तुम्ही पाहू शकता की, तरुण बिळामध्ये पाणी टाकत आहे. याच वेळी सरडा बिळातून बाहेर येते आहे. यानंतर जे घडते ते अगदी भयंकर आहे. यानंतर सरडा बिळातून बाहेर येताच तरुण त्याला तोडांनी पकडून वर काढतो. काही सेंकदातच सरड्याला बाहेर काढतो. सध्या या धक्कादायक प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दिल्ली मेट्रोत पुन्हा दे दणादण! दोन महिलांमध्ये सीटवरुन जबर हाणामारी, Video Viral
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इनस्टाग्रामवर @viralfe_ या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहे. अनेकांनी यावर भीती व्यक्त केली आहे. यामुळे तरुणाचा जीव गेला असता असे अनेकांचे म्हणणे आहे, तर प्राण्यांची छेड काढणे गुन्हा आहे असेही लोकांनी म्हटले आहे. अशा व्यक्तींना अद्दल घडली पाहिजे. एका युजरने म्हटले आहे की, सरडा विषारी असायला पाहिजे होता, म्हणजे कळाले असते. दुसऱ्या एका युजरने देखील अशीच प्रतिक्रिया दिली आहे. तर एका युजरने भाऊ हे अरब लोक काहीही करु शकतात असे एका युजरने म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे.
अजूनही माणूसकी जिवंत आहे! पुरात अडकलेल्या वासरासाठी तरुणाने लावली जीवाची बाजी, Video Viral
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.