दिल्ली मेट्रोत पुन्हा दे दणादण! दोन महिलांमध्ये सीटवरुन जबर हाणामारी, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये दिल्ली मेट्रोचे तर अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. कुठे रिल्स बनवतानाचे व्हिडिओ, तर कुठे कपल्स रोमान्सचे व्हिडिओ, तर कुठे महिलांच्या भांडणाचे व्हिडिओ. कोणत्या ना कोणत्या कारणावरुन दिल्ली मेट्रो चर्चेत असते. दिल्ली मेट्रोत महिलांची तर सतत भांडणे होत असतात. महिला अगदी एकमेकांच्या झिंझ्या उपटतात, कपडे फाडतात, एकमेकांना चिमटेही काढतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
यामध्ये दोन महिलांमध्ये सीटवरुन वाद सुरु झाला असल्याचे सांगितले जात आहे. दोन्ही महिला एकमेकांना पाठीत सपासप मारताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन्ही महिला मोठ मोठ्याने ओरडत आहेत. एका महिलेने दुसऱ्या महिलेची केस ओढून तिला हाणले आहे. दुसरी महिला देखील काही कमी नाही, आपल्या पर्सने तिला हाणण्याचा प्रयत्न करत आहे. या महिलांचा वाद सोडवण्यासाठी अगदी एक महिला पोलिस प्रवासी देखील आहे. पण या महिला काही ऐकण्याचे नाव घेईनात. एकमेकींना शिवीगाळ करत, मारत आहे. एक पुरुषही या भांडणे थांबवण्यासाठी आला होता. पण तो मध्येच अडकला आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओ
Kalesh b/w 2 ladiez inside delhi metro over a seat issue.
pic.twitter.com/P8Kkad2Ncx— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) August 30, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींना हे रोजचं झालयं असे म्हटले आहे, तर काहींना दिल्ली मेट्रो टीव्ही पेक्षा जास्त एनटरटेनिंग आहे असे म्हटले आहे. एका युजरने, तिसरे महायुद्ध हे मेट्रोमधील सीटवरुन होणार आहे, याला आपण सीट वॉर म्हणू असे म्हटले आहे. तर आणखी एका युजरने भाऊ या महिलांना एवढा जोर येतोच कसा? असा प्रश्न त्याने विचारला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
भटक्या कुत्र्यांचा कहर! ७ वर्षांच्या चिमुकलीवर हल्ला केला अन्…; पुढं जे घडलं थरारक, Video viral
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.