जीवाशी खेळ! चालू ट्रेनमधून पुलावर उतरला अन् धावतच सुटला... ट्रेनसोबत लावली अनोखी शर्यत; अंगावर शहारे आणणारा Viral Video
आजकाल स्टंटबाजी हा तरुणांमध्ये वाढत चाललेला ट्रेंड आहे. लोकांना थक्क करण्यासाठी नको त्या गोष्टी करुन, स्वत:चा जीव धोक्यात घालून हे स्टंट्स केले जातात. बऱ्याचदा लोक हे स्टंट करताना लोक आपल्या जीवाचीही पर्वा करत नाहीत. अशात नुकताच तरुणाचा असाच एक थरारक स्टंट सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे ज्यात तो चालू ट्रेनमधून उतरुन उंच पुलावर पळताना दिसून आला. हे दृश्य कुणाच्याही अंगावर क्षणात अंगावर शहारे आणण्यासारखा आहे कारण इतक्या उंचीवरुन पळणं आपल्या जीवासाठी धोकादायक ठरु शकतं. व्यक्तीची एक चूक त्याला आयुष्यभरासाठी महागात पडू शकते. चला व्हिडिओत नक्की काय आणि कसं घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, एक तरुण चालू ट्रेनमध्ये स्टंटबाजी करताना दिसून येतो. ट्रेन पुलावरुन जात असतानाच तो ट्रेनमधून बाहेर उतरत, थेट पुलावर चढतो आणि तिथून पळतच ट्रेनसोबत शर्यत करु लागतो. व्हिडिओत तरुण पुलावरुन खाली कोसळत असताना त्याच्या खाली खोल अंतर असल्याचे दिसते, म्हणजेच चुकून जरी तरुणाचा पाय घसरला तर त्याचे काही खैर नाही. असोत… सुदैवाने तरुण या स्टंटबाजीत यशस्वी होतो आणि पुल संपताच खाली उतरुन पुन्हा चालत्या ट्रेनमध्ये चढतो. तरुणाला यात काही होत नाही पण हे दृश्य पाहणाऱ्यांच्या मात्र पोटात गोळा येतो. जीवाचा खेळ करुन कधीही अशी धोकादायक स्टंटबाजी करु नये. यूजर्सनेही तरुणाच्या या प्रकाराला मूर्खपणा मानत यावर आपल्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
तरुणाच्या स्टंटबाजीचा हा व्हिडिओ @officialjagtar34 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “यमराजाचा पुतण्या आहे तो” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पुढचा व्हिडिओ पोलीस स्टेशनातून येईल” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मरण्याची कामे का करतात हे लोक”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.