(फोटो सौजन्य: Instagram)
सोशल मीडियावर एका अनोख्या खेळाचा व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे. आजवर अनेक विचित्र आणि आश्चर्यचकित करणारे व्हिडिओज आपण इथे पाहिले आहेत पण नुकताच इथे व्हायरल झालेला हा प्रकार तुमच्या कल्पनेपलीकडचा असणार आहे. यात जर्मनीतील एका खेळाचे भीतीदायक दृश्य दिसून आले आहे, जे पाहून सर्वच अवाक् झाले. व्हिडिओतील दृश्ये इतकी धोकादायक होती की सर्वांनाच यासंबंधित जाणून घेण्यास उत्सुकता निर्माण झाली. चला तर मग व्हिडिओत नक्की काय दिसलं आणि हा खेळ नक्की काय आहे ते सविस्तर जाणून घेऊया.
काय दिसलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात दोन जण काळे कपडे परिधान करून आगीत मिसळून जाताना दिसून येत आहे. त्याच्या हातात एक शस्त्र आहे जे आगीने भरलेलं आहे. या शस्त्राला हवेत झेपावताच यातून आगीच्या असंख्य चिंध्या बाहेर पडतात ज्यात त्या दोन व्यक्तींचेही शरीर उजळून निघते. पाहताना अद्भूत आणि भितीदायक वाटणारी ही दृश्ये ही दृश्ये खरंतर एका फेस्टीव्हलमधील आहेत. माहितीनुसार, उन्हाळी संक्रांतात जर्मनीमध्ये साजरा केला जाणारा हा सण आहे. अक्रोडाचे तुकडे आगीत पेटवले जातात आणि नंतर अंगाऱ्यांनी डब्यात भरपूर छिद्रे असलेल्या काठ्या यात टाकल्या जातात. व्हिडिओत दोन व्यक्ती जे आगीत सादरीकरण करत आहेत, त्याला ‘फायर डान्सर’ असे म्हटले जाते. या उत्सवात लोक एकत्र येऊन मोठ्या आगी लावतात, ज्याला ‘मिडसमर फायर’म्हणतात. या आगी वाईट आत्म्यांना पळवून लावण्यासाठी आणि नवीन सुरुवात साजरी करण्यासाठी लावल्या जातात.
हा व्हायरल व्हिडिओ @visitkutnahora नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून अनेकांनी व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मला हे लाईव्ह पहायचे आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मला वाटते की अग्निशामक जादूगार असे दिसतात” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे खूप भारी आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.