व्हॅक्युम क्लिनरमध्ये मुलाची आत्मा केली कैद; थरारक दृश्ये पाहून आवाक् व्हाल; Video Viral
असे म्हणतात की, शरीराचा नाश झाला तरी त्याचा आत्मा राहतो. आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जाऊ शकतो. मग ते शरीर कोणाचेही असो. आत्मा ही अशी गोष्ट आहे जी सामान्य व्यक्तीला आपल्या डोळ्यांनी दिसू शकत नाही. अनेक वैज्ञानिकांनी आजवर आत्म्याबाबत अनेक दावे आहेत. पण आजपर्यंत याचे ठोस पुरावे मिळालेले नाहीत. पण नुकताच शरीरातून आत्मा बाहेर काढण्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यातील थरारक दृश्ये पाहून आता सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. यात नक्की काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती बेडसमोर उभी आहे. त्याचे मित्रही त्याच्याभोवती उभे असतात. मुलगा पूर्णपणे निर्जीव दिसत आहे. समोर उभ्या असलेल्या एका व्यक्तीने त्याची कॉलर पकडली आहे. अचानक तो माणूस त्या मुलाच्या तोंडात व्हॅक्यूम क्लिनरचा पाइप टाकतो. त्यानंतर मुलाच्या तोंडातून धूर येऊ लागतो. धूर बाहेर आल्यानंतर हा दूर थेट पाईपमध्ये जाऊ लागतो. सगळा धूर तोंडातून बाहेर पडून पाईपमध्ये मिसळताच मुलगा बेडवर निर्जीव पडला.
रेल्वे स्टेशनवरच पत्नीने पतीला केली मारहाण, एका फटक्यात उचलले आणि जमीवरच नेऊन आपटले; Video Viral
तथापि, व्हिडिओमध्ये मुलाच्या हातात एक व्हेप म्हणजेच ई-सिगार देखील दिसू शकतो. ज्यावरून धूर त्याच वाफेचा असल्याचे दिसून येते. ज्याला पाईपच्या साहाय्याने बाहेर काढले जात आहे. मुलांनी मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ बनवला असून त्यामध्ये त्यांनी शरीरातून आत्मा कसा बाहेर येतो हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओतील दृश्ये हे खरे वाटत नसून हा व्हिडिओ बहुदा मनोरंजक दृष्टीने बनवला असावा. यातील दृश्ये आता अनेकांना अचंबित करत असून लोक हा व्हिडिओ वेगाने शेअर करत आहेत.
हा व्हायरल व्हिडिओ @carlosmazenn नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये, ‘तुझा आत्मा हा माझा आहे” असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत 1 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले असून अनेकांनी कमेंट्स करून या प्रकारावर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “त्याने हातात नक्की काय पकडले आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे अलौकिक कथानक आहे का?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे भयानक आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.