आता काय तुझी खैर नाही...! मुलगा इंजेक्शन घेत नाही म्हणून आईने थेट खऱ्याखुऱ्या पुतीनला रुग्णालयात बोलावलं... मजेदार Video Viral आता काय तुझी खैर नाही...! मुलगा इंजेक्शन घेत नाही म्हणून आईने थेट खऱ्याखुऱ्या पुतीनला रुग्णालयात बोलावलं... मजेदार Video Viral
लहान मुले ही फार मुडी असतात. लहान मुलांना कोणत्याही गोष्टीसाठी तयार करणं म्हणजे एक आव्हानच आहे. अशात अनेक आई-वडील आपल्या मुलांना हवी ती गोष्ट करून घेण्यासाठी किंवा त्यांना मनवण्यासाठी त्यांच्या आवडीच्या गोष्टीचे आमिष दाखवतात किंवा कोणत्या भयानक गोष्टीची त्यांना भीती घालतात. सर्व घरांमध्ये सुरु असलेला हा प्रकार तुमच्यासोबतही लहानपणी कधी ना कधी नक्कीच घडला असावा पण यात एका आईने मात्र हद्दच पार केली. मुलगा इंजेक्शन घ्यायला तयार नाही म्हणून त्याच्या आईने थेट रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना रुग्णालयात बोलावले. ही घटना आता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असून पुतीनने खरोखर रुग्णालयात येऊन लावलेली हजेरी आता सर्वांना थक्क करत आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
या घटनेचा व्हिडिओ व्हिडिओ @sasta_insaan__नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेविषयीची सर्व माहिती देण्यात आली असून यात लिहिले आहे की, ‘आज आपण काय शिकलो? रुग्णालये बहुतेक आपल्या भीतीवर उपचार करणारी असतात भीती देणारी नाहीत. हॉस्पिटलच्या बेडवर पडलेला एक मुलगा, स्वतःच्या कामात व्यस्त, कदाचित नियमित डॉक्टरांच्या तपासणीची वाट पाहत होता. तितक्यात अचानक दार उघडते… आणि स्टेथोस्कोप असलेल्या सामान्य डॉक्टरऐवजी, व्लादिमीर पुतिन आत येतात. एकटे, अरे नाही – तो त्याच्या संपूर्ण बॉडीगार्ड्सला घेऊन येतो, सर्व डॉक्टरांसारखे कपडे घालून… पाहून वाटतं जणू हॅलोविन जवळ आला आहे. तो मुलगा त्याच्याकडे एक नजर टाकतो, त्याला कळते की ही काही सामान्य ‘डॉक्टर भेट’ नाहीये आणि लगेचच सर्वात तार्किक गोष्ट करतो: तो त्याच्या चेहऱ्यावर ब्लँकेट ओढतो जसे ‘नाही, मी या कथेसाठी साइन अप केले नव्हते.’ कारण चला खरे बोलूया – रशियाचे राष्ट्रपती तुमचे तापमान तपासण्यासाठी आले होते हे तुम्ही तुमच्या मित्रांना कसे समजावून सांगाल?
पुढे यात लिहिलं आहे की, दरम्यान, पुतिन, पूर्णपणे गंभीर, आईशी अशा प्रकारे बोलू लागतात की हा आतापर्यंतचा सर्वात सामान्य घरचा फोन कॉल आहे. लॅब कोटमध्ये मागे उभे असलेले रक्षक शस्त्रक्रिया करणार असल्यासारखे दिसतात परंतु त्याच वेळी ते न्यूक्लीअर कोड्सचेही संरक्षण करतात. रुग्णालये ताप, फ्लू आणि फ्रॅक्चर बरे करू शकतात… पण जर पुतिन तुमचे डॉक्टर म्हणून आले तर तुम्हाला फक्त थेरपीची आवश्यकता असेल’. कॅप्शनमध्ये लिहिलेली सर्व माहिती आपल्याला व्हिडिओतील घटना समजून घेण्यास मदत करते. लक्षवेधी ठरणारी ही घटना आता इंटरनेटवर जोरदार धुमाकूळ माजवत आहे तर लोक हा व्हिडिओ वेगाने शेअर देखील करत आहेत.
व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “आणि तो तुळस आता न्यूक्लियर इंजेक्शन देईल” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हा त्याच्या आयुष्यातला शेवटचा इंजेक्शन ठरेल” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “आता त्याला मृत्यू आणि इंजेक्शनपैकी काहीतरी एक निवडावं लागेल”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.