Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral News: ना रस्ता, ना रुग्णवाहिका! आजारी मुलीला खांद्यावर घेऊन आईची ७ किमी पायपीट

Viral News: आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यातील पल्लापु डुंगडा या आदिवासी गावात मुसळधार पाऊस आणि वादळामुळे कच्चे रस्ते वाहून गेले. त्यामुळे गावाचा संपर्क तुटला. याचवेळी जन्नी सुंकरम्मा यांची १२ वर्षांची मुलगी संपूर्णा आजारी पडली.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 03, 2026 | 01:45 PM
Viral News: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Viral News: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • रस्ते वाहून गेल्याने गावाचा संपर्क तुटला.
  • आजारी १२ वर्षीय मुलीला आईने खांद्यावरून ७ किमी नेले.
  • नारा लोकेश यांच्या निर्देशानंतर खासदारांनी गावाला रुग्णवाहिका देण्याची घोषणा केली.

आंध्र प्रदेशातील एका छोट्याशा गावात घडलेली ही गोष्ट वाचून डोळ्यात पाणी येईल. आपण शहरात राहतो, थोडं दुखलं तरी लगेच गाडी बोलावतो. पण विजयनगरम जिल्ह्यातील एका आदिवासी पाड्यावर रस्ताच नाही, मग अ‍ॅम्ब्युलन्स येणार कुठून? Viral News:

नेमकं काय घडलं?

पल्लापु डुंगडा नावाचं एक छोटं आदिवासी गाव आहे. श्रुंगवरपुकोटा भागात हे गाव येतं. तिथे जन्नी सुंकरम्मा नावाची एक महिला राहते. तिच्या 12 वर्षाच्या मुलीचं नाव संपूर्णा. काही दिवसांपूर्वी खूप मोठा पाऊस झाला. वादळामुळे सगळे कच्चे रस्ते वाहून गेले. गावाचा बाहेरच्या जगाशी संपर्कच तुटला. नेमक्या त्याच वेळी संपूर्णा खूप आजारी पडली. तिला ताप आला, तिला चालताही येत नव्हतं. गावात दवाखाना नाही, डॉक्टर नाही.

मग काय करायचं? एका आईपुढे दुसरा पर्यायच नव्हता. सुंकरम्माने आपल्या लेकीला उचललं आणि थेट खांद्यावर घेतलं. एका हातात तिने पाण्याची बाटली आणि एक छोटी पिशवी घेतली आणि दुसऱ्या खांद्यावर 12 वर्षाच्या मुलीला घेऊन ती चालत निघाली. रस्ता कुठे होता? सगळीकडे चिखल, दगड, ओढे आणि झाडं पडलेली. वादळाने सगळं खराब करून टाकलं होतं. त्या कठीण वाटेतून तिने जवळपास 7 किलोमीटर अंतर चालून काढलं. डब्बागुंटा नावाच्या डोंगराच्या पायथ्यापर्यंत ती चालत आली. तिथून कसाबसा एक ऑटो मिळवला आणि मग मुलीला एका खाजगी हॉस्पिटलमध्ये नेलं.

Boss Threatens Employee Over Approved Leave: ‘लॅपटॉप बंद तर पगार बंद!’ सुट्टीवरही कामाची सक्ती, बॉसचा मेसेज पाहून नेटकरी संतापले

डॉक्टरांनी मुलीवर उपचार केले. उपचार झाल्यावर परत येतानाही त्या माऊलीने त्याच जिद्दीने मुलीला पुन्हा खांद्यावर घेतलं आणि घरी परतली. त्या आईची ती जिद्द पाहून सगळेच हेलावून गेले.

Andhra News- Tribal lady carried her 12 year old daughter on her shoulders for nearly 7 km to reach a hospital. Rajya Sabha MP Vijay Chintakayala announced that he would provide an ambulance to Pallapu Dungada through his MPLADS. https://t.co/ejVCq0jUvW — News Arena India (@NewsArenaIndia) November 2, 2026

आता सरकारला जाग आली

ही बातमी सोशल मीडियावर पसरली आणि सगळीकडे हळहळ व्यक्त झाली. मंत्री नारा लोकेश यांनी लगेच याची दखल घेतली आणि अधिकाऱ्यांना त्वरित कारवाई करायला सांगितली.

सगळ्यात मोठं पाऊल उचललं आहे खासदार विजय चिंताकायाला यांनी. त्यांनी सांगितलं की, “यापुढे कोणत्याही आईला स्वतःचीच अ‍ॅम्ब्युलन्स बनावं लागणार नाही.” त्यांनी आपल्या खासदार निधीतून म्हणजेच MPLADS मधून त्या गावासाठी एक संपूर्ण नवीन अ‍ॅम्ब्युलन्स देण्याचं जाहीर केलं आहे. हा माझा छोटासा प्रयत्न आहे, असं ते म्हणाले.

Saif Ali Khan Viral Video : सोमवारचा कंटाळा की हॅलोविन लूक? सैफ अली खानचा मजेशीर व्हिडिओ व्हायरल

खरं तर हा एका गावाचा प्रश्न नाही. अशा दुर्गम आदिवासी भागात आजही पक्के रस्ते नाहीत. पावसाळा आला की गावं बंद होतात. आज एका आईला मुलीला खांद्यावर न्यावं लागलं, उद्या अशी वेळ दुसऱ्या कोणावर येऊ नये म्हणून रस्त्याचं काम लवकर होणं गरजेचं आहे. आईचं प्रेम किती मोठं असतं हे या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिलं.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यातील पल्लापु डुंगडा या आदिवासी गावात ही घटना घडली.

  • Que: मुलीचे नाव काय आहे आणि तिचे वय किती आहे?

    Ans: मुलीचे नाव संपूर्णा असून ती १२ वर्षांची आहे.

  • Que: आईला मुलीला खांद्यावरून का न्यावे लागले?

    Ans: पाऊस आणि वादळामुळे कच्चे रस्ते वाहून गेले होते. गावात दवाखाना किंवा डॉक्टरही उपलब्ध नव्हते.

Web Title: Mother carries sick daughter 7 km tribal village ambulance andhra pradesh rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 01:45 PM

Topics:  

  • shocking viral news
  • viral news
  • Viral News update

संबंधित बातम्या

Boss Threatens Employee Over Approved Leave: ‘लॅपटॉप बंद तर पगार बंद!’ सुट्टीवरही कामाची सक्ती, बॉसचा मेसेज पाहून नेटकरी संतापले
1

Boss Threatens Employee Over Approved Leave: ‘लॅपटॉप बंद तर पगार बंद!’ सुट्टीवरही कामाची सक्ती, बॉसचा मेसेज पाहून नेटकरी संतापले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.