
Boss Threatens Employee Over Approved Leave (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
ऑफिसमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला असं वाटतं की सुट्टीच्या दिवशी तरी आपल्याला कोणी त्रास देऊ नये. महिनाभर आधी प्लॅन करून, सगळं मॅनेज करून आपण सुट्टी काढतो. पण सुट्टी मंजूर होऊन सुद्धा बॉसने कामावर बोलावलं तर? असाच काहीसा प्रकार एका कर्मचाऱ्यासोबत घडला आहे आणि त्याची पोस्ट आता इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहे.
एका तरुणाने Reddit वरील ToxicWorkplace नावाच्या ग्रुपवर आपली व्यथा मांडली आहे. त्याचं म्हणणं असं आहे की त्याने कित्येक महिन्यांपूर्वी सुट्टीसाठी अर्ज केला होता. कंपनीने त्याला सुट्टी दिली सुद्धा होती. त्याला वाटलं होतं की या सुट्टीत तो निवांत राहील, कामाचा टेन्शन घेणार नाही. Boss Threatens Employee Over Approved Leave:
पण सुट्टीच्या एक-दोन दिवस आधीच बॉसने त्याला मेसेज केला. बॉस म्हणाला की सुट्टीच्या दिवशी एक महत्वाची ऑनलाइन मीटिंग आहे आणि तुला ती अटेंड करावीच लागेल. त्या कर्मचाऱ्याने नम्रपणे सांगितलं की, साहेब माझी सुट्टी आधीच मंजूर आहे, मला त्या दिवशी कामापासून लांब राहायचं आहे.
हे ऐकल्यावर बॉसचा मूडच गेला. त्याने त्या कर्मचाऱ्याला बाजूला बोलावलं आणि म्हणाला, तू टीमचा विचार करत नाहीस. तू सहकार्य करत नाहीस. जर तू मीटिंगला आला नाहीस तर पुढच्या महिन्यात जो तुझा परफॉर्मन्स रिपोर्ट होणार आहे, त्यात मी याची नोंद करेन. एक प्रकारे त्याने त्याला धमकीच दिली.
आता हा कर्मचारी पूर्णपणे अडकून गेला आहे. त्याला प्रश्न पडला आहे की मीटिंग अटेंड केली नाही तर माझ्या कामावर त्याचा परिणाम होईल आणि जर केली तर माझी सुट्टी कशाला घेतली? मंजूर सुट्टीचा अर्थच काय राहिला?
त्याने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, मला खूप असहाय्य वाटत आहे. मी सुट्टीसाठी लॉगिन केलं तर ती सुट्टी राहणारच नाही. असं करणं योग्य आहे का? बॉस अशा प्रकारे वागू शकतो का? अजून कोणी असा अनुभव घेतला आहे का?
Saif Ali Khan Viral Video : सोमवारचा कंटाळा की हॅलोविन लूक? सैफ अली खानचा मजेशीर व्हिडिओ व्हायरल
ही पोस्ट टाकताच लोकांनी त्यावर कमेंटचा पाऊस पाडला. 2200 पेक्षा जास्त लोकांनी ती पाहिली आहे. बऱ्याच लोकांनी त्या कर्मचाऱ्याला सपोर्ट केला आहे. सगळेच म्हणत आहेत की आजकाल कंपन्या फक्त काम बघतात, कर्मचाऱ्याच्या आयुष्याचा विचार करत नाहीत.
एकाने कमेंट केली की, तू सरळ एचआरला मेल कर. बॉसने जे काही बोलला ते सगळं लिहून एचआरला पाठव. कंपनीचं सुट्टीचं नक्की धोरण काय आहे ते विचार. एखादी इमर्जन्सी असेल तर ठीक आहे, पण प्रत्येक सुट्टीत असं होत असेल तर ते चुकीचंच आहे.
दुसऱ्या एका युजरने आपला अनुभव सांगितला. तो म्हणाला की आमच्या ऑफिसमधल्या एचआरने अशा बॉसला चांगलंच सुनावलं असतं. चांगल्या कंपनीत एचआर कर्मचारी आणि कंपनी दोघांचाही विचार करून निर्णय घेते.
तर तिसऱ्या व्यक्तीने सांगितलं की त्याने आईच्या तब्येतीसाठी कामाच्या वेळेत बदल मागितला होता. त्याने तर जास्त काम करायची तयारी पण दाखवली होती, तरी त्याचा मॅनेजर नाखूष होता. पण जेव्हा त्याने एचआरला त्या मेलमध्ये टाकलं तेव्हा लगेच त्याचं काम झालं.
खरं तर हा प्रश्न फक्त एका व्यक्तीचा नाही. बऱ्याच ऑफिसमध्ये सुट्टी मंजूर झाली तरी कर्मचाऱ्याला फोन करून, मीटिंगला बोलावून त्रास दिला जातो. कंपनीने सुट्टी मंजूर केली म्हणजे त्या दिवशी त्या व्यक्तीला मोकळं सोडायला हवं. हा त्याचा अधिकार आहे. पण काही बॉसना हेच कळत नाही.
Ans: बॉसने सुट्टीच्या दिवशी होणाऱ्या महत्त्वाच्या ऑनलाइन मीटिंगला उपस्थित राहण्यास सांगितले.
Ans: पुढील महिन्याच्या परफॉर्मन्स रिपोर्टमध्ये याची नोंद करण्याची धमकी दिल्याचा कर्मचाऱ्याचा दावा आहे.
Ans: अनेकांनी कर्मचाऱ्याला पाठिंबा देत बॉसच्या वागणुकीवर नाराजी व्यक्त केली.