Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई पोलिसांची गणपती बाप्पाला मानवंदना; व्हिडीओ पाहून तुमचाही उर भरून येईल

अनंत चतुर्दशीच्या दिवशी  देशभरात गणेश विसर्जन झाले आहे. लोकांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला आहे. दरम्यान, अनंत चतुर्दशीच्या शुभमुहूर्तावर मुंबई पोलीस बँड खाकी स्टुडिओने देखील बाप्पाला निरोप दिला. त्यांनी संगीतमय अशी मानंवंदना बाप्पाला वाहिली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 18, 2024 | 11:38 AM
मुंबई पोलिसांची गणपती बाप्पाला मानवंदना; हा व्हिडीओ पाहून तुमचाही उर भरून येईल

मुंबई पोलिसांची गणपती बाप्पाला मानवंदना; हा व्हिडीओ पाहून तुमचाही उर भरून येईल

Follow Us
Close
Follow Us:

अनंत चतुर्दशीच्या दिवशी  देशभरात गणेश विसर्जन झाले आहे. लोकांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला आहे. पुढच्या वर्षी लवकर या म्हणत आशेने लोक आश्रूच्या डोळ्यांनी गणपती बाप्पाला निरोप सर्वत्र निरोप देण्यात आला. तुम्ही सोशल मीडियावर बाप्पाच्या निरोपाचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. लोक अगदी बाप्पाच्या मिरवणुकीत मग्न होऊन जातात. पाणवलेल्या डोळ्यांनी बाप्पाचे विसर्जन करतात. सगळ्यांनी असंख्य भावना मनात घेऊन बाप्पाला निरोप दिलेला आहे.

दरम्यान, अनंत चतुर्दशीच्या शुभमुहूर्तावर मुंबई पोलीस बँड खाकी स्टुडिओने देखील बाप्पाला निरोप दिला. त्यांनी संगीतमय अशी मानंवंदना भगवान गणेशाला वाहिली. मुंबई पोलिस बँडचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकांच्या पसंतीस पडत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकजण भावनिक झाले आहेत. पोलीस बँडने गणपती बाप्पाला अतिशय मनमोहक पद्धतीने निरोप दिला आहे.

मुंबई पोलिसांनी बाप्पाला दिला संगीतमय निरोप

मुंबई पोलिसांनी इन्स्टाग्रामवर बाप्पाच्या निरोपाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘खाकी स्टुडिओकडून बाप्पाला निरोप. अनंत चतुर्दशीच्या शुभ मुहूर्तावर मुंबई पोलिस बँडच्या खाकी स्टुडिओचा शानदार परफॉर्मन्स.’ व्हिडीओमध्ये एक गणवेशधारी पोलीस अधिकारी बँडसमोर उभे राहून बँडची धून दिग्दर्शित करत असल्याचे तुम्ही पाहू शकता. बँड आपल्या सुरात बाप्पाला संगीतमय पद्धतीने निरोप देत आहेत. बँडने “एकदंताय वक्रतुंडाय” हे भक्तिगीत वाजवले आहे. मुंबई पोलीस बँडची धून ऐकून सगळेजण मंत्रमुग्ध झाले. हा व्हिडीओ सर्वत्र मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात येत आहे.

व्हिडीओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया

मुंबई पोलिस बँडचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकांना आवडला आहे. हा व्हिडीओ हजारोहून अधिक लोकांनी पाहिला आणि लाईक केला आहे. तसेच बँड पोलिस अधिकाऱ्यांचे लोक कौतुक करत आहेत. एका युजरने पोस्टवर कमेंट केली की, ‘हे लोक गणवेशात उभे आहेत, त्यामुळे गर्दीत सण साजरा केला जाऊ शकतो.’ दुसरा म्हणाला, ‘बाप्पाला खरा निरोप, एक उत्तम कामगिरी.’ तर आणखी एकाने ‘सणांच्या काळात आमच्या सुरक्षेबद्दल मुंबई पोलिसांचे आभार.’ तसेच अनेकांनी व्हिडीओवर गणपती बाप्पा मोरया देखील म्हटले आहे. काही लोकांनी बाप्पा चालले म्हणत रडण्याचा इमोजी शेअर केला आहे.

Web Title: Mumbai police pays tribute to ganapati bappa nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2024 | 11:38 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.