
वाह रे मुंबई! रिक्षाच्या छतावर श्वान, खाली ट्रॅफिक... प्राण्याची अनोखी राईड पाहून युजर्स झाले खुश; Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये रस्त्यावर काही वाहने दिसत आहेत आणि त्यांच्यामध्ये एक ऑटोरिक्षा देखील चालत आहे. रस्त्यावरील या ट्राफिकदरम्यानच एक अनोखे दृश्य सर्वांचे लक्ष वेधते. व्हिडिओमध्ये नीट पाहिल्यास यात आपल्याला एक कुत्रा आरामात ऑटोरिक्षाच्या छतावर बसल्याचे दिसून येते. तो कधीतरी ऑटोरिक्षावर बसला असावा आणि मालकाने तो सुरू करण्यापूर्वी ते लक्षात घेतले नसेल. अशात ऑटोरिक्षासह श्वानानेही मुंबईच्या रस्त्यांचा आनंद लुटला आणि आपली राईड एन्जॉय केली. रिक्षाच्या मागे उभ्या असलेल्या गाडीतील व्यक्तीने हे दृश्य आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केले आणि हा व्हिडिओ इंटरनेटवर शेअर केला. व्हिडिओ श्वानाचा हा पराक्रम पाहून आश्चर्यचकित झाले असून याचा व्हिडिओ आता वेगाने इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
अनेकदा आपल्याला वाटणारी लहान गोष्ट प्राण्यांना मोठा आनंद देऊन जाते. याचप्रमाणे श्वानानेही आपल्या पहिल्या रिक्षा राईडचा आनंद घेतला जो आयुष्यभर त्याला लक्षात राहावा असा होता. हा व्हिडिओ @vibes_of_people नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “डाॅगेश भाऊ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्याने आयुष्यातील सर्वात सुंदर आनंद घेतला” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ही मुंबई आहे इथे काहीही घडू शकते ”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.