(फोटो सौजन्य – Instagram)
व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेल्या वधूनेच आता याबाबत मोठे विधान केले आहे. तिचे नाव श्रुती असून व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर १९ डिसेंबर रोजी श्रुती पहिल्यांदाच बोलली की, “ती व्हायरल क्लिप खरी नव्हती, तर स्क्रिप्टेड होती. वधूची भूमिका साकारण्यासाठी मला शेवटच्या क्षणी निवडण्यात आले.” तिने पुढे धक्कादायक सत्य उघड केले. व्हिडिओ तिच्या संमतीशिवाय अपलोड करण्यात आला होता. श्रुतीने स्पष्ट केले की तिला आशा होती की कंटेंट क्रिएटर, आरव मावी, योग्य स्पष्टीकरण, टॅगिंग किंवा चर्चा करून व्हिडिओ जबाबदारीने शेअर करेल, परंतु व्हिडिओ तिच्या माहितीशिवाय किंवा हा व्हिडिओ काल्पनिक असं नमूद न करता त्याला अपलोड करण्यात आलं. तरुणीच्या या खुलास्यानंतर अनेकांना आता जाऊन स्पष्ट झालं आहे की तो व्हिडिओ स्क्रिप्टेड होता.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लगेचच श्रुतीला लक्ष्य करण्यात आले. लोकांनी तिच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि तिच्या पालकांना, ज्यांचा या घटनेशी काहीही संबंध नव्हता, त्यांना या प्रकरणात ओढण्यात आले. यामुळेच श्रुतीने समोरून व्हिडिओचे सत्य उघड करण्याचा निर्णय घेतला आणि यावर आपली प्रतिक्रिया दिली. श्रुतीने आपल्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करत लोकांना घटनेची माहिती दिली आहे आणि हे उघड केलं आहे की व्हायरल होत असलेला तो व्हिडिओ खरा नसून पूर्णपणे स्क्रिप्टेड आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






